Home महाराष्ट्र भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचा भेल प्रकल्पग्रस्त उपोषणाला पाठिंबा

भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचा भेल प्रकल्पग्रस्त उपोषणाला पाठिंबा

65

 

किशोर बावणे, विशेष प्रतिनिधी मो. 73507 93187

 

साकोली : ०५ जुलैपासून भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना वतीने भेल प्रकल्प सुरु करण्यात यावा व इतर मागण्यासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणास भंडारा जिल्हा सरपंच संघटनाच्या वतीने मंगळवारी ०९ जुलैला उपोषण मंडपास पदाधिकारी यांनी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
पाठींबा देत दिलेल्या पत्रकात नमूद की, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना यांच्या या निरंतर आंदोलनात शासनाने तातडीने दखल घेऊन याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करा. सदर संघटनेच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देवून बंद असलेली भेल कंपनी प्रकल्प तात्काळ सुरु करावे. आज जिल्ह्यात युवा बेरोजगारांची लाखोंच्या संख्येने फौज निर्माण होत आहे. तरी या गंभीर विषयी दखल घेत हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावा. उपोषण मंडपास भंडारा जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष शरद इटवले, हरीशचंद्र दोनोडे, विलास नंदूरकर, शिशुपाल सलामे, साकोली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांसह भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना अध्यक्ष विजय नवखरे, सचिन दुरूगकर व साखळी उपोषणकर्ते याप्रसंगी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here