Home महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेतील जाचक अटी रद्द करा ! जाचक अतिमूळे...

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेतील जाचक अटी रद्द करा ! जाचक अतिमूळे हजारो महिला योजनेत सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची शक्यता

165

 

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये अनेक महिला अपात्र ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून या योजनेसाठी चार चाकी वाहनाची अट, उत्पन्नाची अट, ६० वर्ष वयाची अट, जमिनीची अट, अधिवास प्रमाणपत्राची अट, तहसीलदार यांच्या उत्पन्न दाखल्याची अट रद्द करून तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा यासह विविध जाचक रद्द करून सरकारने विविध अटी शिथिल कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितददा पवार यांच्याकडे केली आहे.
लाडकी बहीण योजनेत बदल केल्यास मोठ्या प्रमाणत महिलांना या योजनेत सहभागी होता येणार असून यातील काही नियम सरकारने शिथिल केल्यास या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.
ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार ६० वर्षा वरील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे ६० वर्षांवरील महिलांना श्रावण बाळ योजनेचा लाभ ६५ वर्ष वय झाल्यानंतर मिळत असल्यामुळे ६० ते ६५ वर्षांमधील महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरातील कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही या योजनेसाठी हजारो महिला अपात्र ठरणार आहे. त्यामुळे शासनाने गरजू वंचित महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी करून घेण्यासाठी विविध अटी शिथिल करून त्यांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here