Home Breaking News मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात यावी-महेंद्र ब्राह्मणवाडे

183

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
गडचिरोली :: राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजने करीता १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ ही आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्वर डाऊन असल्याने अनेक महिला भगिनींना नाहक त्रास करावा लागला. जिल्ह्यातील अनेक भागात नेट च्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. 15- 20 किमी चा अंतर कापून  अर्ज भरण्याकरीता सेतू केंद्रावर पोहचा लागतो. त्यामध्ये सुद्धा सर्वर बंद पडल्याने महिला भगिनींना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र आणि इतर कागद पत्रे त्यांच्या कडे नाही, हे कागद पत्र गोळा करण्यात 20-25 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 15 जुलै पर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेकरीता अर्ज सादर करता येणार नसून जिल्ह्यातील अनेक महिला या योजनेपासून वंचित राहु शकतात, मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने जर ही योजना यशस्वी करायची असेल तर कुठल्याही जाचक अटी न ठेवता, गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे. सोबतच अधिवास प्रमाणपत्र सारख्या कागदपत्राच्या जाचक अटी रद्द काढून सरसकट सढळ हाताने मदत करावी. व अर्ज सादर करण्याची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here