Home महाराष्ट्र मा.गुलाबराव पाटील साहेब यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट

मा.गुलाबराव पाटील साहेब यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट

128

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – आपल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाने मा.नामदार गुलाबराव पाटील साहेब यांची भेट घेऊन आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांना आपण एक राज्याचे तथा मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे सहकारी मंत्री असल्याने आपण आमचे प्रश्न मार्गी लावावेत म्हणून त्यांच्या कडे साकडे घातले आणि नामदार भाऊंनी आपल्या मागण्या मी सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या कडेस पाठपुरावा करेल असे आश्वासन पदाधिकारी यांना दिले

त्यात प्रामुख्याने १)आम्हाला मिळणारे मार्जीन वाढवून मिळावे २) शासकीय गोदामातून येणारे धान्य पूर्ण मोजून मिळावे तसेच मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे ३) ekyc साठी प्रती व्यक्ती ५० रुपये शुल्क मिळावे ४) मार्जीन मनी त्वरित दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मिळावे ५) इष्टांक वाढवून मिळावा ६) गोदामातून धान्य हे ज्यूट बारदान मधूनच मिळावे अश्या अनेक मागण्याचे निवेदन देऊन आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा असे निवेदन देण्यात आले

प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री जी.डी.पाटील तसेच उपाध्यक्ष श्री प्रभाकर अण्णा पाटील तसेच श्री सोपानशेठ पाटील श्री अमृत पाटील श्री दिलीप शिंदे श्री दिपक भदाणे श्री सुदर्शन पाटील श्री विशाल पाटील तसेच संघटनेचे मार्गदर्शक श्री राजूशेठ ओस्तवाल तसेच श्री अमोल भाऊ पाटील उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here