चिमूर..
चिमूर वरोरा महामार्गाचे काम सुरु असून खडसंगी वहानगाव च्या दरम्यान पूल बांधकाम सुरु असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गेल्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दखल घेऊन केसीसी कंपनीला नुकसान भरपाई देण्याची सूचना केली असता कंपनी चे विजयकुमार यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
पूल बांधकाम सुरु असल्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसा मुळे काही शेतकऱ्यांच्या पेरणी झालेल्या शेताची नुकसान झाली होती. त्यात सोयाबीन, कापूस पीक पाण्या खाली आल्या ने नुकसान झाले.तेव्हा भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बनसोड यांनी खडसंगी येथील त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन केसीसी कंपनी त जाऊन शेतकऱ्यांची आपबिती सांगितली. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी भ्रमनध्वनी वरून केसीसी कंपनी चे व्यवस्थापक विजय कुमार यांना बजावून दोन दिवसात नुकसान भरपाई देण्याची अवधी देत सूचना केली.कंपनीने रोख स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचे मान्य करीत आश्वासन दिले.
भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बनसोड यांच्या सोबत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांत सागर गेडाम, बबन कुबडे, संदिप बोस्कर, विजय सोयाम, पत्रू चट्टे, विजय बोरसरे, फकीरा पातर व शत्रुघ्न चट्टे तसेच भाजप कार्यकर्ते वेणूदास बारेकर, राजु लाकडे, रवींद्र कोलते, उपसरपंच संदीप बोस्कर, सुरेंद्र मत्ते नरेश मोटे, उमेश चट्टे, मनी रॉय, आदित्य वासनिक उपस्थित होते.