Home यवतमाळ उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

286

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 29 जून)
मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी उमरखेड येथील भारत फायनांन्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपीतांनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना झाली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरखेड येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक १३०/२०२४ कलम ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. दिनांक २७/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक उमरखेड उपविभागात अवैध धंदे विषयक कारवाई, अ उघड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार असलेले आरोपोंचा शोध घेणे संबंधाने उमरखेड परिसरात पेट्रोलोंग करीत असतांना पथकास गोपणीय बातमी प्राप्त झाली की,

आनंद नगर परिसरातील घरफोडोची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजो वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असुन शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन असुन त्याने राखाडी रंगाचे शर्ट परिधान केले आहे. वरुन पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करणे साठी तात्काळ सदर ठिकाणी जावुन माहिती प्रमाणे वर्णनाचे इसमाचा शोध घेत असतांना वर्णना प्रमाणे इसम बसस्थानक उमरखेड परिसरात मिळुन आल्याने त्याच त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव १) शेख निसार शेख उस्मान वय ३२ वर्ष, रा. शिवाजी वार्ड उमरखेड असे सांगीतल्याने त्यास आनंद नगर येथील घरफोडी बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदची चोरो त्याचे उमरखेड येथील साथीदार २) आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड ३) फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम नगर नांदेड रोड उमरखेड ४) अब्दुल कहुस शेख मुज्जीत रा. एम. के. गार्डन रोड, उमरखेड यांचे सोबत मिळुन केल्याचे व तिजोरीतील पैसे आपआपसात वाटुन घेतल्याचे सांगीतल्याने नमुद सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन त्यांनी गुन्हयात वापरलेल्या तिन मो.सा. व गुन्हयातील रक्कमेतुन खरेदी केलेली बुलेट व मोबाईल असा एकुण ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयात आरोपी क्र.५) शेख अजहर उर्फ शुट शेख अकवर रा. उमरखेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन तो सध्या उमरखेड येथील एका गुन्हयात न्यायालयीन कोटडीत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपीतांना पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here