Home यवतमाळ पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर MPDA व व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे...

पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर MPDA व व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा (संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ची निवेदनातून मागणी)

244

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 28 जून)
शेख ईरफान शेख ईसा पत्रकार उमरखेड यांच्यावर झालेल्या हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर कलम 307 आणि कलम 110 व MPDA कायद्या अंतर्गत व पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करावी व आरोपीला अभय देणारे अधिकारी, ठाणेदार उमरखेड, ए.पी.आय. सरदार यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा दिला आहे.

दि.23/06/2024 रोजी वाढदिवस साजरा करून घरी जात असतांना रात्री अंदाजे 9.00 वा. चे दरम्यान आरोपी 1) शेख मजहर शेख अल्लाऊद्दीन, वय अं.25 वर्ष, 2) शेख अजहर शेख अल्लाऊद्दीन, वय अं. 30 वर्ष, 3) आरिष खतीब, वय अं.25 वर्ष व इतर साथीदार हे नांदेड रोडवरील एम. के, कॉम्प्लेक्स समोर एकत्र येवुन त्यांना रस्त्यात अडवून त्यांचे डोक्यात चाकु मारुन प्राणघातक हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद पोलीस स्टेशन उमरखेडला दिली होती. परंतु त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली नाही आरोपीवर कलम 307, 110 आणि MPDA व पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करावी व विशेषतः यातील आरोपी क्र. 1 ते 3 यांनी यांच्यावर हल्ला करुन डोक्यात चाकु मारुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

यातील या आरोपीवर उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत यापूवी अनेक गंभीर गुन्ह्याच्या नोंद असल्याने आरोपी क्र. 1 ते 3 यांचेवर MPDA कायद्याच्या अंतर्गत सुध्दा कारवाई करावी याबाबत संयुक्त पत्रकार संघाने तक्रार देवूनही पोलीस अधिकाऱ्यांनी तशी नोंद न घेता गुन्हेगारांना वाचविण्याच्या प्रयत्नाने अभय दिलेले आहे.

या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शाहरुख पठाण हे व जलील कुरेशी यांनी चिथावणी देवून प्रोत्साहीत केल्याची माहिती मिळत आहे आणि जलील कुरेशी यांचेवर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये दंगा भडकविणे व प्रत्यक्ष सहभाग याबाबतीत गुन्हा केल्याने तशी नोंद आहे. तसेच शाहरुख पठाण हे स्वामी विवेकानंद विद्यालय, हरदडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असतांनाही तिथे व इतर परिसरात जातीयवाद निर्माण करून सामाजिक सलोखा विघडवित असल्याची तक्रार संबंधीत शाळा प्रशासनास दि. 5 मार्च 2024 रोजी दिलेली होती असे चरित्र शाहरुख पठाण यांचे आहे.

या प्रकरणातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न शाहरुख पठाण व जलील कुरेशी यांच्याकडून झाला असल्याने या दृष्टीने चौकशी करुन त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करावी
वरील आरोपी पैकी अनेकांनी येथील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आणल्याबाबत त्यांचेवर गुन्हे नोंद आहेत.

अशा गुन्हेगारांकडून शेख ईरफान शेख ईसा यांचेचर प्राणघातक हल्ला केल्याने तशी फिर्याद शेख ईरफान शेख ईसा यांनी दिली असतांना यातील आरोपीना बचावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न झाला आहे आणि यातील आरोपीने स्वतःच्या अंगावर स्वतःच ईजा पोहचवून त्यांचेकडून फिर्याद घेऊन शेख ईरफान शेख ईसा यांना दबावात आणण्याचा प्रयत्न आरोपी व पोलीस प्रशासनाकडून केल्या गेला आहे.

वरील आरोपीवर कलम 307, 110, एमपीडीए कायदा अंतर्गत व पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी व आरोपीला अभय देणार्या ठाणेदार सोळंके व ए.पी.आय. सरदार यांचेवर बदलीची कारवाई तात्काळ करावी. अन्यथा दि. 02/07/2024 पासून महसुल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना संयुक्त पत्रकार संघाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून म्हटले आहे यावेळी संयुक्त पत्रकार संघाचे समस्त पदाधिकारी व सभासद हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here