चिमूर ( प्रतिनिधी)
गेल्या सात वर्षांपासून चिमूर ते वरोरा या रस्त्याचे बांधकाम अजुनही पूर्ण झालेले नाही.
खडसंगी, शेगाव या बसस्थानकाचे ठिकाणी नुकतेच पावसाळ्यापूर्वी काम सुरू केले आहे. मधेमधे छोट्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असुन रस्ता बाजूने काढलेला आहे.आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य आहे.
चिमूर ते वरोरा रस्त्याने दिवसराञ वाहनांची वर्दळ असते. बस, खाजगी ट्रव्हल्स, ट्रक,मालवाहू वाहने, कार, बाईक इ.ची रेलचेल असते. लोक जीव मुठीत घेवून या रस्त्याने प्रवास करतात.वाहने या मार्गाने हेलकावे खात असतात. बसचालकांना अतिशय कमी वेगाने वाहने चालवावी लागतात.या रस्त्याने वाहन चालवताना खूप ञास होतो.
या मार्गावरील लोकांनी सदर समस्येबाबत अनेकदा संबंधिताना अवगत केले, आंदोलने केली तरी अजुनपर्यंत काम पूर्ण झालेले नाही.
दररोज या मार्गाने शाळा, काॅलेजचे विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक व सर्वसामान्य जनता यांचा प्रवास सुरू असतो. त्याप्रमाणेच खडसंगी ते कोरा या मार्गाचेसुध्दा काम अपूर्ण आहे. या दोन्ही रस्त्यांची अवस्था सारखीच म्हणजे जीवघेणी आहे.
सदर दोन्ही रस्त्यावर बांधकाम पूर्ण करावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. विदर्भातील हेवीवेट मंञी मा.ना.नितीनजी गडकरी हे रस्ते व वाहतूक खात्याचे भारत सरकारमध्ये मंञी आहेत तर महाराष्ट्र राज्यात मा.ना.रविंद्रजी चव्हाण हे बांधकाम मंञी आहेत. मग या रस्त्यांची एवढी मॊठी दुरावस्था का? स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी या समस्येकडे लक्ष देवून या दोन्ही रस्त्यावर रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील जनतेने दिलेला आहे.