चंद्रपूर येथील आदिवासी मुलीला जातीवाचक शिवीगाळ,मारझोड,व अश्लिल शिवीगाळ करून केस ओढून छातीवर हात लावणारे आरोपी ४०दिवस होऊन अटक न झाल्याने पिढीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज आदिवासी टायगर सेना व पीडित मुलीला घेऊन चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
आरोपी वर १६/५/२०२४ ला
भा.द.वी 353 (A) (1)(i),294,506, 34सह अनुसूचित जाती_जमाती (अत्याचार प्रतिबंधक) 3(2)(va),3(1)(W) गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु अजूनही आरोपी प्रबोधकुमार जाडाजी,पंकज सिंग, कुमार पाल हे अजूनही मोकाट आल्याने वारंवार हे फिर्यादी मुलीला धमकी देत आहेत की,केस मागे घ्या.नाही तर जिवे मारू अशी धमकी देत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांनी वारंवार उडवा उडवी चे उत्तर देत आहे.अशी माहिती फिर्यादी मुलींनी आदिवासी टायगर सेना चे ऍड संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष ऍड जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष, प्रियंका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष,रंजीत मडावी जिल्हा अध्यक्ष युवक, विराज सुरपाम जिल्हा महासचिव युवा.ह्यांना निवेदन देऊन व आपबीती सांगितली, प्रकरणाची गंभीरता लक्ष्यात घेता आदिवासी टायगर सेना च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उप विभागीय पोलिस अधिकारी ह्यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले. तरीही पोलिस विभाग मार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस विभाग ह्यांना धारेवर धरले. फिर्यादी युवतींनी पत्रकार परिषद घेत सांगितले की मला व माझ्या परिवाराला काही झाल्यास ह्यांची सर्व जबाबदारी पोलिस विभागाची राहील.तसेच आरोपींना अटक न केल्यास मी आत्मदहन पोलिस अधीक्षक कार्यालय समोर करेल असा इशारा पत्रकार परिषद घेत दिला.