बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद- जमाअते इस्लामी हिंद,महाराष्ट्र तर्फे राज्यभर दिनांक 20 जून ते 5 जुलै पर्यंत पर्यावरण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. ज्यामध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राज्यभर राबविले जात आहे.आपण या उन्हाळ्यात बघितले आहे.की तापमान काही ठिकाणी 52′ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं होत आणि आपल्या शहरात सुद्धा 46च्या वर तापमान वाढलेले दिसले त्यामुळे अनेक समाज जीवनावर त्याचे दुष्परिणाम झाले.याचे मुख्य कारण म्हणजे वृक्षांची तोड आणि वाढते औद्योगीकरण आहेतच सोबतच आपले पर्यावरणा प्रति असलेला नकारात्मक वर्तन हा सुद्धा आहे. कारण आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात पर्यावरण पूरक कार्य करत नाही तर त्याच्या विपरीत कार्य करतो परिणामी अनेक समस्या निर्माण होतात. जर आपले पर्यावरण सुरक्षित झाले तर परिणामी आपले आरोग्य सुद्धा चांगले होईल.यामुळेच जमाते इस्लामी हिंद, महाराष्ट्र तर्फे राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली.यामध्ये राज्यातील अनेक भागात वृक्ष लागवड, संवर्धन, पाण्या बद्दल जागृती, पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर अश्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे . त्याच अनुषंगाणे आज जमाते इस्लामी हिंद पुसदच्या शिष्टमंडळा तर्फे नगर परिषद पुसदचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये पुसद शहातील पावसाळ्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांना लवकरात लवकर निवारण करावे तसेच पुसद शहरात जास्तीत जास्त झाडे लावावी आणि पुसद मधील अस्वच्छतेची समस्या दूर करावी तसेच जमाते इस्लामी हिंद, पुसद तर्फे अनेक ठिकाणी झाडे लावली जात आहे. त्यामुळे नगर पालीके कडून झाडे मिळाली तर त्याचे संवर्धन करण्यात येईल.अशा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत.सी.ई.ओ साहेबांनी शंभर रोपं देण्याची हमी दिली आणि या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली. या शिष्टमंडळात शेख इब्राहिम सर, हाफीज खलिल शम्सी सर, सैय्यद सलमान सर,गफ्फार अतिष सर,डॉ. मुज्जमिल सर,कामरान खान सर, तज्जमुल हक सर, सलीम भाऊ उपस्थित होते.