Home चंद्रपूर चिमूर शहरातील मासळ चौकातील देशीभट्टी स्थलांतरीत करण्यात यावी – विलास मोहिणकर फिशरमेन...

चिमूर शहरातील मासळ चौकातील देशीभट्टी स्थलांतरीत करण्यात यावी – विलास मोहिणकर फिशरमेन जिल्हा अध्यक्ष उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

423

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी
7887325430

चिमूर : – दिनांक.२७/०६/२०२४ नगर परिषद चिमुर ने दैनंदिन मासे विक्रीची गुजरी हि अगदी देशी दारू विक्रीच्या दुकानाला लागुन दिले गेले असल्याने मासे विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व त्याचबरोबर या देशी दारू दुकानालगत मासळ, कोलारा, पळसगाव, मुल जाणाऱ्या वाहनाचा थांबा (बस स्टॉप) असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ या देशी दारू दुकानावर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे अशी निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांना मागणी करण्यात आली यावेळी देविदास मोहिणकर , चंदू मडकवार , सुभाष मोहिणकर , सुनील हिंगणकर , शारदुल पचारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here