Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष धरणगाव शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष धरणगाव शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती..

384

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील अवलोकन तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी संदर्भात आयोजित चिंतन बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) धरणगाव शहराध्यक्ष पदी लक्ष्मणराव पाटील यांना जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, रावेर लोकसभेचे डॉ.श्रीराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, माजी जि.प.सदस्य रविंद्र पाटील, युवकअध्यक्ष मनोज पाटील, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, दिलीप धनगर, एन.डी. पाटील, नारायण चौधरी, दिनेश भदाणे, निलेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सभेला आजी/माजी आमदार, प्रदेश स्तरावरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महानगरअध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धरणगाव शहराच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीबद्दल लक्ष्मणराव पाटील यांच्या सत्कारप्रसंगी म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, शरदचंद्र पवार यांसह थोर नेत्यांना अराध्यस्थानी मानून पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल व पक्ष बळकटीसाठी, संघटन वाढीसाठी तसेच ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल धरणगाव शहरासह जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

*चौकट:*
[ दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, शरदचंद्र पवार यांना अराध्यस्थानी मानून पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल व पक्ष बळकटीसाठी संघटन वाढीसाठी तसेच ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले.]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here