Home यवतमाळ उमरखेडकरांचा नगर पालिकेवर धडक मोर्चा; कर वाढ रद्द करण्याची केली मागणी ...

उमरखेडकरांचा नगर पालिकेवर धडक मोर्चा; कर वाढ रद्द करण्याची केली मागणी (भिम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा – दादासाहेब शेळके)

161

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (तालुका प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड (दि. 27 जून) नवीन मालमत्ता कर आकारणी रद्द करून जुनीच कर आकारणी पद्धत सुरु ठेवा या प्रमुख मागणीसाठी उमरखेडकरांनी पुरोगामी युवा ब्रिगेड च्या पुढाकारातून नगर पालिकेवर धडक देत निवेदन दिले.

नगरपालिका उमरखेड ने चालू वर्षात नुकतीच मोठ्या प्रमाणात कर वाढ आकारणी सुरू केली असून सदर कर आकारणी संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.अनेक नागरिकांचा यावर रोष आहे. आरोग्य, शिक्षण आदी विषयांवरदेखील मोठ्या प्रमाणात कर वाढ केली आहे.
या अन्यायकारक कर आकारणी रद्द व्हावी यासाठी उमरखेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत उमरखेड नगरपालिकेवर धडक दिली व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

नगरपालिकेने उमरखेड वासियांवर जाणून-बुजून केलेली कर दरवाढी त्वरित कमी करावी अन्यथा पुरोगामी युवा ब्रिगेड आणि भीम टायगर सेना हे संबंधित अधिकाऱ्याला नग्न केल्या शिवाय सोडणार – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

यावेळी अनेक सामजिक संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, युवा, महीला व शेतकरी उपस्थित होते.

सदर मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, भागवत सूर्यवंशी, जाकिर राज, सिद्धार्थ मुनेश्र्वर, अनिल हरणे, गजानन गायकवाड, नवनाथ जाधव, हिरांसिंह जाधव, आकाश लोमटे, योगानंद जाधव, राजेश वाढे, अंबादास गव्हाळे, मनोज धूळध्वज, नागराज दिवेकर, मुक्तार शाह, दत्ता दिवेकर, ताहेर शाह, महेश अन्नछत्रे, प्रवीण बारापत्रे, सिराज खान, संदिप मवाडे, अजय शेळके, माजीद पठाण पुरोगामी युवा ब्रिगेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी दादासाहेब शेळके, राष्ट्रपाल सावतकर, शामभाऊ धुळे, सिंघम ढगे,पत्रकार सिद्धार्थ दिवेकर,कैलास कदम पक्ष व सामजिक संघटना प्रहार, भीम टायगर सेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी युवक आघाडी (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट) , बळीराजा पक्ष, शेतकरी कष्टकरी संघ आदींनी पाठींबा दिला .

चौकट :
“नागरिकांना विश्वासात न घेता अन्यायकारक मालमत्ता कर वाढ चुकीची आहे. मुळात शहरात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसताना करवाढ कशाला ? जी जुनी कर आकारणी आहे तीच कायम ठेवून आधी शाळा, रस्ते, नाली , स्वच्छता आदि मुलभूत सुधारणे कडे नगरपालिकेने लक्ष द्यावे ” -शाहरूख पठाण
(प्रवक्ता पुरोगामी युवा ब्रिगेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here