Home महाराष्ट्र पुसद येथील भिमवाडी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात...

पुसद येथील भिमवाडी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

123

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद-धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२४, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सांची सामाजिक बहुउद्देशीय संस्था भिमवाडी यांच्यावतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती सामूहिक बुद्ध वंदना घेऊन हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२४चे कोषाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तसेच धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२४ चे कार्याध्यक्ष देवेंद्रजी खडसे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील काही ठळक गोष्टींची माहिती सांगितली.

कार्यक्रमाला धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२४चे अध्यक्ष अर्जुन साहेबराव भगत, कोषाध्यक्ष मिलिंद जाधव, कार्याध्यक्ष देवेंद्रजी खडसे, सहकोषाध्यक्ष राहुल पाईकराव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव विनोद कांबळे, तसेच भिमवाडी परिसरातील रहिवासी भास्कर बनसोड, आकाश धवसे, साहिल शिरसाट, संजय गुप्ता, राघोराम गुप्ता, सतीश दुथडे, नंदू ठाकरे, सुमित वाठोरे, योगेश जाधव, अर्जुन उघडे, गवई काका, पिंटू मनवर, किरण मनवर, राजेश धवसे, अजय वाठोरे, अजय ठाकरे, विजय पाईकराव, राहुल राठोड, कमलेश भांगे, गोपाल भांगे, प्रशांत भांगे, संघपाल बनसोड, विशाल पडघने, सचिन पडघने, सुनील खिल्लारे, राजगीर भगत ,अश्विन केवटे ,यश दोडके, आयुष मनवर, करण खिल्लारे, वैभव साखरे ,पवन इंगोले , तसेच महिलां मध्ये वैशाली भगत, सविता धवने,साधना भगत ,सांची भगत, अदिती धवसे ,कल्याणी धवसे, छकुली धवसे, कल्याणी दोडके, शिवानी दोडके, पुष्पा मनवर, रेखा पडघने, यशोदा दुथडे, प्राची भगत, सुंदरबाई भगत, मीनाक्षी भगत, जानवी धवसे, कोमल बनसोड, समीक्षा नरवाडे, समृद्धी बनसोड, संस्कृती बनसोड, व सर्व भीम वाडी परिसरातील उपासक उपासिका व बाल बालिका यांनी उपस्थिती दर्शवून जयंती हर्ष उल्हासात साजरी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here