Home चंद्रपूर दारिद्र्य

दारिद्र्य

104

भारताची एक महत्वाची समस्या म्हणजे दारिद्र्य होय. आज भारताची जवळपास ८०% लोकसंख्या दारिद्र्याचा सामना करीत आहे. समाजातील दारिद्र्य नवीन बाब नाही. भारतीय समाजात मुख्यता आर्थिक दारिद्र्याची समस्या दिसून येते. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ही समस्या दिसून येते.

परंतु इतर देशांच्या तुलनेत भारतीय समाजात दारिद्राची समस्या ही खूप भयंकर आणि वाईट आहे.

भारतीय समाजातील दारिद्र्याचा अभ्यास करताना दारिद्र वाढीचे अनेक कारणे दिसून येतात. औद्योगिकरण, यांत्रिकीकरण व बेकारी यांचा उल्लेख करावासा वाटतो. परंतु या कारणांसोबतच इतर अनेक दारिद्र्यचे कारणे आहेतच त्यामध्ये

१) वाढती लोकसंख्या :- भारतीय समाजात दारिद्र्य वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाचा वेग १, २, ३, ४ असा असतो तर लोकसंख्या वाढीचा दर २, ४, ८, १६, ३२ असा असतो. यामुळे उत्पनाचे प्रमाण कमी व लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे दारिद्र्याची समस्या वाढते.

२)व्यसनाधीनता :- व्यसनाधीनता ही देखील दारिद्र्य निर्मितीचे कारण आहे. आजही समाजात मध्यपान, सट्टा, जुगार यांसारख्या व्यसनामुळे कित्येक व्यक्तीचे कुटुंब दारिद्र्याचा सामना करतांना दिसतात. व्यसनामुळे कित्येक व्यक्ती आपल्या जवळील संपत्तीची उधळपट्टी करून टाकत असतो आणि आपल्या कुटूंबाला दारिद्र्याचा खाईत आणून सोडतो.

३)व्यक्तिगत कारणे :- दारिद्र्य वाढीसाठी जेवढी आर्थिक आणि सामाजिक कारणे जबाबदार आहेत तेवढीच व्यक्तीची व्यक्तीगत कारणे सुद्धा जबाबदार आहेतच. त्यामध्ये बेकारी, आळशीपणा, मोठेपणाचा खोट्या कल्पना करणे याप्रमाणे आणखी खूप कारणे देता येणार यांमुळे व्यक्ती कामे करीत नाहीत आणि बेकार राहून तो दारिद्र्याला आमंत्रण देत असतो.

४)वाढते तंत्रज्ञान :- औद्योगीकरणही दारिद्र्याचे कारण आहेत. औद्योगीकरण आणि यांत्रीकीकरणामुळे दारिद्र्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. नवनवीन यंत्र तयार करून लवकरात-लवकर उत्पादन कसे निर्माण करता येणार याकडे जास्त लक्ष आहेत. यांमुळे कामगाराध्ये बेकारीचे प्रमाण वाढत आहेत. १०० व्यक्तीचे कामे जेव्हा एक यंत्र करू शकतो त्यामुळे ९९ व्यक्ती बेकार झाले आहेत असे दिसून येते. यामुळे कामगाराच्या हाताला कामे नाहीत त्या बेकारीचे प्रमाण वाढून दारिद्र्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.

जर आपल्याला दारिद्र्याचे प्रमाण कमी करायचे आहेत तर काही गोष्टी करणे खूप खूप महत्वाचे आहे.

लघु उद्योगाला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. यांत्रीकीकरणामुळे बेकरीची संख्या खूप वाढली आहे. यामुळे उद्योगधदयाना वाढवावे लागतील यामध्ये गृह्योद्योग, हस्तोद्योग यांसारख्या लघू उद्योगाला प्रोत्साहन दिल्यास बऱ्याच रिकाम्या हातांना काम मिळेल आणि काही प्रमाणात दारिद्र्य कमी होण्यास मदत मिळेल.

समाजातील आत्यतिक आर्थिक विषमता नष्ट करून सर्वाना काम व सर्वाना त्यांचा योग्य मोबदला मिळेल अशी परिस्थिती निर्माण करणे अंत्यत आवश्यक आहे. म्हणजेच समानता आणण्याचा प्रयत्न केल्यास कमी प्रमाणात बेकारी आणि दारिद्र कमी होण्यास मदत मिळेल.

✒️सुयोग सुरेश डांगे(संपादक पुरोगामी एकता)मो:-8208946716

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here