Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी ...

फुले एज्युकेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी भारतात आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराज यांचे मोलाचे कार्य – सत्यशोधक रघुनाथ ढोक

173

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता . श्री.शाहू मंदिर महाविद्यालय आवरातील भव्य पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे नि.सदस्य व फुले एज्यकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सत्यशोधीका आशा ढोक , अनंतराव पवार इंजिनिरिंग कॉलेज चे नितीन रणधीर ,शाहू महिला मंडळाचे प्रमुख सौ.करपे व संस्थेचे महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की सक्तीच्या मोफत प्राथ. शिक्षणाच्या शाळा प्रत्येक गावी काढण्याच्या योजनेची अंमलबजावणी शाहू महाराजांनी मोठ्या धडाडीने केली. काही गावांत शाळेस योग्य इमारतीच नव्हत्या. अशा गावातील देवळाचा वापर शाळेसाठी करावा व अशा देवळात गावची चावडी असेल तर पाटलाने ती आपल्या घरी नेऊन देऊळ शाळेसाठी रिकामे करावे असा क्रांतीकारी आदेश सन 1918 मद्ये काढणारा महान राजा राजर्षी शाहू महाराज तर होतेच सोबत महात्मा फुले यांच्या सत्यशोधक कार्याचा त्यांचे वर प्रभाव असल्याने त्यांनी अंधश्रध्दा कर्मकांड याला तिलांजली देत वैदिक वर्चस्व नाकारले. पुढे ढोक म्हणाले की महाराजांनी जातीभेदाच्या पलीकडे जावून मौलिक कार्य करताना गंगाराम कांबळे यांना सत्यसुधारक हॉटेल काढण्यास मदत केली. त्याचप्रमाणे इतरांना व डॉ.बाबासाहेब यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करीत ,मुंबई येथे जावून आंबेडकरांचा सन्मानाने सन्मान देखील केला.भारतात प्रथम आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाचे जनक म्हणून संपूर्ण मानवजातीला समान न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधी उपस्थित असल्याने आशा ढोक यांनी सर्वांचे आभार मानत महात्मा फुले रचित सत्याचा अखंड यावेळी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here