कराड ( दि.26) स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून संपूर्ण समाजाच्या हितासाठी कार्य करणारे प्रजाहितदक्ष छत्रपती म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय असे प्रतिपादन प्रा. एस एस बोलाइकर यांनी केले.
प्रा. एस एस बोलाइकर हे वेणूताई चव्हाण कॉलेज कराड आयोजित राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. पुढे ते असे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या व संस्थानातील रयतेच्या विकासासाठी कृषी, सिंचन, समाज सुधारणा, शिक्षण, जातीभेद निर्मूलन इत्यादीसाठी अमुलाग्र असे कार्य केले त्यांच्या त्या कार्याचा व त्यांच्या सर्वसमावेशक विचारांचा आजच्या पिढीला उपयोग होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीमती एस आर सरोदे यांनी भूषविले अध्यक्षीय मनोगत करताना त्या म्हणाल्या की, राष्ट्राचा विवेकशील नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरा करणे व त्यांचे विचार ऐकणे गरजेचे आहे. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.कांबळे,प्रा. श्रीमती मधाळे,प्रा. श्रीमती पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर आर थोरात यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती टी टी सरकाळे यांनी करून दिला ,कार्यक्रमाचे आभार प्रा.एम एस बागवान यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीमती एन एस देसाई यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.