Home यवतमाळ अवैध व्यवसाय व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला – शेख इरफान

अवैध व्यवसाय व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला – शेख इरफान

358

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 26 जून) अवैध व्यवसाय व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला असावा असा गंभीर आरोप शेख इरफान यांनी केला आहे.

शेख इरफान त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित असलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमावर काही युवकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न दिनांक 23 जून रविवारच्या रात्री 9:40 वाजताच्या दरम्यान केला.

असे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते ते म्हणाले की, सदर हल्ला हा मी केलेल्या अवैध रेती व्यवसाय, तांदूळ गैरव्यवहार आणि अवैध प्लॉट विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे झाला असावा अशी माहिती शेख इरफान शेख इसा यांनी विश्रामगृह उमरखेड येथे पत्रकार परिषदेतून माहिती दिली.

रविवार दिनांक 23 जून च्या रात्रीच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम. के. कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करत असताना तेथे माझे दोन सखे भाऊ शेख मुजाहिद शेख इसा व शेख नदीम शेख इसा, भाविक भागत, अनुप शेखावत यांच्यासह माझी बरीच मित्र मंडळी हजर होती.

वाढदिवस साजरा करत असताना तेथे बाजूला लहान मुलांचे भानगड सुरू असताना मी ते सोडविण्यासाठी गेलो असता तेथे हजर असलेल्या शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख अल्लाउद्दीन हे अचानक आले व शिवीगाळ करून मला पकडू लागले. त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने माझ्या डोक्यावर डाव्या बाजूला मारून जखमी केले तसेच आरिष खतीब यांनी मला लाथा बुक्क्‌याने मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिली.

वरील तीनही आरोपींनी लहान मुलांचे भानगड सोडवण्यासाठी का ? आला या कारणावरून वाद करून मला चाकू मारून जखमी केले.

सदर आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून ते कधी काय करतील याचा नेम नाही. अशी तक्रार मी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

पोलीस प्रशासनाला विनंती केली असल्याची माहिती पा. उमरखेड वातार्चे संपादक शेख इरफान शेख इसा यांनी पत्रकार परिषदेमधून
दिली.

चौकट:- उमरखेड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ – शिवाजी माने अलीकडच्या काळात उमरखेड शहरात गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे उमरखेड शहरात कायद्याचा पुरता बदूयाबोळ झाला. अवैद्य लेआउट करून प्लॉट विक्री करणाऱ्या वर शेख इरफान यांनी तक्रार दाखल केली.

सदर प्रकरणावर तहसील प्रशासनाकडून अवैध प्लॉट विक्री करणाऱ्यावर पाच कोटी रुपयांचा दंड झाला. यामधून हा प्रकार घडला असावा किंवा त्याचा वचपा काढण्यासाठी सुद्धा झाला असावा याबाबत पोलीस प्रशासनाने तपास करणे गरजेचे आहे. यासोबतच नगरपरिषद अंतर्गत असलेल्या एका शाळेत तांदूळ अपरातफर संदर्भात सुद्धा तक्रार दाखल केली.

अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून या प्रकरणांमधून नायब तहसीलदार यांच्यावर सुद्धा चाकू हल्ला केला होता. त्यांच्याकडून सुद्धा सदर हल्ल्याचा प्रकार घडला असावा अशी शंका शिवाजी माने यांनी व्यक्त केली. या तीनही घटनेच्या प्रकरणावरून झालेल्या हा हल्ला आहे का? याचा शोध घेऊन पोलिसांनी तपास करावा तसेच पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 307 चा गुन्हा सुद्धा नोंद करून प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेमधून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here