उपक्षम रामटेके (सहसंपादक) – मो. 9890940507
चंद्रपुर – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी देश पातळीवर कार्यरत व्हॉईस ऑफ मिडीया या संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर चिमुर येथील पत्रकार श्रीहरी उर्फ बाळु सातपुते यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी केली आहे.
श्रीहरी सातपुते हे गेल्या वर्शभरापासुन व्हॉईस ऑफ मिडीयामध्ये कार्यरत असुन त्यांची कार्य करण्याची पध्दत व संघटन कौशल्याची दखल घेवुन त्यांची व्हॉईस ऑफ मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मिडीया या देश पातळीवरील पत्रकारांची संघटनेची सर्वात जास्त सदस्य संख्या म्हणुन नोंद घेण्यात आली आहे. या नामवंत संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर आपली निवड केल्याबद्दल विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे जाहीर आभार सातपुते यांनी मानले. व्हॉईस ऑफ मिडीया ही उपक्रमशील संघटना असुन यात चंद्रपुर जिल्हयाने विशेष कार्यासाठी आपली ओळख निर्माण केली आहे. यापुढे सुध्दा चंद्रपुर जिल्हयात संघटन वाढीसाठी आपला विशेष योगदान देण्याचा प्रयत्न असेल असे मत श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले. श्रीहरी सातपुते यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातुन यांचे अभिनंदन होत आहे.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व अन्य रचनात्मक कार्यात प्रत्यक्ष सहभागी राहत असणारे श्रीहरी सातपुते यांची व्हॉईस ऑफ मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल पुरोगामी न्युज नेटवर्क परिवाराचे वतीने अभिनंदन करण्यात आले.