Home यवतमाळ आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी आरोपी ताब्यात

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी आरोपी ताब्यात

350

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेडः – (दि. 23 जून) विशिष्ट समाजाचा उल्लेख करून मोबाइलवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या.

याप्रकरणी 20 जून रोजी उमरखेड पोलिसांनी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री 11:30 वाजता दरम्यान आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली.

आहे. राहुल तामसकर रा. आठवडी बाजार, उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या मोबाइलवरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने या पोस्टमुळे विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या.
त्यामुळे 20 जून रोजी रात्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला रात्री अटक करण्यात आली. तसेच त्याच्याविरोधात उमरखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात एपीआय निलेश सरदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here