Home यवतमाळ योगदिनाचे औचित्य साधून माणुसकीची भिंतला दिपकभाऊ आसेगावकर यांच्याकडून एकावन्न हजार रुपयांच्या भांड्याची...

योगदिनाचे औचित्य साधून माणुसकीची भिंतला दिपकभाऊ आसेगावकर यांच्याकडून एकावन्न हजार रुपयांच्या भांड्याची भेट.

116

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद-माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवराच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
दातृत्व हा एक गुण असतो,तो ज्यांच्या अंगी असतो तो गरीब व श्रीमंत या विभूतीमध्ये पहावा लागतो. एखाद्या व्यक्तीकडे गडगंज पैसा असणे म्हणजे तो दाता असेलच असे नाही पण पैसा असूनही दानत्व असावं लागते आणि याच दातृत्वाचे धनी म्हणजे दीपक भाऊ.
यावेळेस दीपक भाऊ असेगावकर यांनी माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाकरिता स्वयंपाक बनवण्यासाठी भांड्याची गरज पाहता एकावन्नहजार रुपयाची भांडी भेट म्हणून दिली. अन्नदानाचा उपक्रम अविरत चालू राहावा म्हणून अनेक शुभचिंतक सदैव मदत करत असतातच पण माणुसकीच्या भिंतीला उपयुक्त भेट दीपक भाऊनी अन्नदान उपक्रमासाठी दिली ,माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाला दैनंदिन स्वयंपाक बनवण्यासाठी ही भांडी उपयोगात येणार सोबतच ही भांडी गरजवंत पाल्यांच्या लग्ना प्रसंगी मोफत देण्यात येणार आहेत असे मनोगत माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केले.
पुसद शहरातील व पुसद जवळील खेड्यातील गरजू लोकांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या घरातील कोणत्याही शुभकार्यासाठी ही सर्व भांडी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, ज्यांना या भांड्याची गरज असेल त्यांनी भांडे घेऊन जाणे व शुभकार्य संपल्यानंतर ही भांडी वापस आणून देणे,कोणतेही भाडे न घेता ही भांडी गरजूंना मोफत वापरण्याकरिता देण्यात येणार यामुळे गरजूंना मदत होईल.
यावेळेस माणुसकीची भिंत सदस्यांनी दीपक भाऊ आसेगावकर यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणूनही दिली व त्यांचे आभार मानले. उद्या असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. व प्रकाश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक व पुसद येथील गरजूंना पोळी भात भाजी जिलेबीचे अन्नदान करण्यात आले
यावेळी उपस्थित मान्यवर वसंतराव प्रतिष्ठान अध्यक्ष व मोक्षधाम समिती अध्यक्ष मा.दीपकभाऊ असेगावकर,सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज,शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव,शिवप्रभा ट्रस्ट उपाध्यक्ष परशराम नरवाडे,प्रकाश भोसले सर, डेकाटे मॅडम उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन माननीय रमेश डंबोळे यांनी केली व आभार परशराम नरवाडे यांनी मानले.
यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव,सचिव सोहम नरवाडे, सदस्य धनंजय आघाव,पंजाब ढेकळे, माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या मोनिका जाधव,अर्चना गावंडे,पूजा इंगोले,रेखा आगलावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here