चिमूर,( प्रतिनिधी)
नागपूर येथील मुख्य रेल्वेस्थानकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टर्मिनस तर अमरावती येथील मुख्य रेल्वेस्थानकास कर्मयोगी संत गाडगेबाबा टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी राज्यस्तरिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारकृती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहितकर गुरूजी चिमूर यांनी एका प्रसिद्धीपञकाव्दारे केलेली आहे.
भारतातील अनेक महापुरूषांची,थोर व्यक्तींची नावे अनेक रेल्वेस्थानकास आहेत.मुंब ईच्या रेल्वेस्थानकास छञपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे.विदर्भाच्या भूमीतले क्रांतीकारी थोर संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे समाजपयोगी,राष्ट्रीय कार्य,शॆक्षणिक कार्य चिरस्मरणात ठेवण्याजोगे आहे.रेल्वेने लाखो प्रवाशी रोज प्रवास करतात.सततची ये— जा सुरू असते.परदेशातील व परराज्यातील प्रवाशी,पर्यटक यांचा वर्षभर रेल्वेने प्रवास सुरू असतो.रेल्वे ही जनतेची फार मोठ्या प्रमाणात सेवा करते. या दोन्ही संताच्या थोर कार्याला एक मानाचा मुजरा म्हणून महाराष्ट्र शासनाने नागपूर येथील मुख्य रेल्वे स्थानकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टर्मिनस तर अमरावती येथील मुख्य रेल्वेस्थानकास कर्मयोगी संत गाडगेबाबा टर्मिनस असे नाव देण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या रेल्वे विभाग व गृह विभाग यांचेकडे त्वरित पाठवावा अशी आग्रही मागणी राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी केलेली आहे.