*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा. 9075686100*
म्हसवड : सांगली जिल्हा भटके विमुक्त विकास मंचच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण वसगडे ता.पलूस तर कार्याध्यक्षपदी रमेश जावळे, इस्लामपूर व सचिवपदी मुनीवर शिकलगार,विटा यांची निवड सांगली येथील बैठकीत एकमताने करण्यात आली. त्यानंतर इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिरतोडे उपळावी ता.तासगाव, कोषाध्यक्ष अनिल मोरे, कुपवाड, जिल्हा संघटक सतिश शिकलगार,तर सल्लागार व म्हणून महेश मदने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सांगली जिल्हा भटकेविमुक्त विकास मंच ही संघटना सांगली जिल्ह्यातील समस्त भटकेविमुक्त जमातीच्या प्रश्नावर काम करत आहे.जिल्ह्यातील वंचित,उपेक्षित व मागास असलेल्या जमातीचे सर्वेक्षण,प्रबोधन,संघटन व क्षमता बांधणी करून शिक्षण,शासकीय कागदपत्रे,निवारा,कौशल्य विकास, उपजिवीका,अन्यायअत्याचार या प्रश्नावर काम करत आहेत. यापुढे प्रत्येक गावात जाऊन भटकेविमुक्त जमातीचे संघटन करण्यास येणार आहे.तसेच१५जुलैपासून जिल्ह्यात शासकिय कागदपत्रे तयार करण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे.लवकरच भटकेविमुक्त संवादयात्रा व कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.