Home चंद्रपूर काँग्रेस कमिटी तर्फे रेंगाबोडी रस्त्यावर काळे झेंडे व बेशरमाचे झाडे लावून निषेध...

काँग्रेस कमिटी तर्फे रेंगाबोडी रस्त्यावर काळे झेंडे व बेशरमाचे झाडे लावून निषेध नोंदविण्यात आला

211

 

✍️ शार्दुल पचारी प्रतिनिधी
7887325430

चिमूर :- वरून हिंगणघाटमार्गे वर्धा
जाणारा कमी अंतराचा मार्ग म्हणून वाहनधारक हिंगणघाट ते खडसंगी मार्गाला पसंती देतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही महिन्यांपासून हिंगणघाट ते खडसंगी या राज्य मार्गाचे काम सुरू आहे. मात्र कोरा, आमडी, रेंगाबोडी हा रस्ता पूर्णतः खोदून माती टाकण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे वाहनचालकांना चिखलात रस्ता शोधावा लागत आहे त्याच प्रमाणे शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना सुद्धा रस्त्याने जाणे येणे करिता त्रास सहन करावा लागत आहे माती मिश्रित मुरूम टाकल्याने या रस्त्यावर कधीही अपघात होऊ शकतो त्याच प्रमाणे रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम केले मात्र पाणी जाण्यासाठी कुठलेही वेवस्था केली नाही शेतकऱ्यांच्या शेतावर जाणारा रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे चिमूर हिंगणघाट जाणारा रस्ता हा आमडी भिवंकुंड पर्यंत चिमूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो तर भिवंकुंड पासून नंदोरी हिंगणघाट रस्ता हा बांधकाम विभाग हिंगणघाट यांच्या हद्दीत येतो मात्र या रस्त्यावर पूर्ण नियंत्रण हे हिंगणघाट बांधकाम विभाग यांच्याकडे आहे या रस्त्यावर प्रशासनाचे व कंत्राकदाराचे दुर्लक्ष आहे याची माहिती मिळताच राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांनी रेंगाबोडी येथे जाऊन पाहणी केली व काँग्रेस पदाधिकारी व गावकऱ्यांसोबत काळे झेंडे व बेशरम चे झाडे लावून निषेध व्यक्त केला या वेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बूटके, चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, काँग्रेस नेते विवेक कापसे,शिवसेना नेते प्रशांत कोल्हे,शांताराम धानोरकर,बबन कुबडे, तेजराम झाडे,विनायक वाकडे, खटू कोवे, मनोहर तराळे, शंकर नंन्नावरे, भैया कारेकर, देवरावजी लाटकर, सूरज गलांडे, वैभव वाकडे, रामाजी शेंडे, गुरुदेव तराळे, कृष्णा बारस्कार, अमित तराळे, सूरज रामूगुंडे, उमेश ठोंबरे, गजाजन थुटे,व गावकरी मंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here