Home महाराष्ट्र बुद्धाच्या शील मार्गाचे पालन म्हणजे दहा पारमिताची परिपूर्णता करणे होय ! -धम्मसंगिती

बुद्धाच्या शील मार्गाचे पालन म्हणजे दहा पारमिताची परिपूर्णता करणे होय ! -धम्मसंगिती

111

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद-प्रवज्रक भिकूस अर्हतपद प्राप्त करण्याकरिता शील मार्गाचे पालन करणे आवश्यक असते. शिल मार्गाचे पालन म्हणजे दहा पारमिताची परिपूर्णता करणे होय.जो प्रवज्रक भिकू दहा पारमिताची परिपुर्तता करतो तो अर्हतपदास प्राप्त होतो. शिल, दान, उपेक्षा, नैष्क्रिम, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करूणा, मैत्री ह्या त्या पारमिता असून निबाण मार्गावरील भिकूनी या दहा पारमिताची परिपूर्तता करणे आवश्यक आहे,असे धम्मसंगितीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी ‘बुद्धाचा शील मार्ग’ या विषयावर धम्मसंगितीत झालेल्या चर्चेचा अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले.
शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी ८-३० ज्येष्ठ पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन चार्वाकवनात करण्यात आले होते.

वदंनेनंतर तुकाराम चौरे यांनी बौद्धधम्मातील ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व विशद केले आणि प्रा. जनार्धन गजभिये एक भावपूर्ण भीमगीत सादर केले. त्यानंतर ‘बुद्धाचा शील मार्ग ‘ या विषयावर धम्मसंगितीत चर्चा झाली.

यावेळी पी.बी.भगत,यशवंतराव देशमुख, डी.जी.गोस्वामी, एम. एल. धुळध्वज, गोवर्धन मोहिते, रमाकांत मामीडवार आणि अॕड.अप्पाराव मैन्द यांनी भाग घेतला.
धम्मसंगितीत सर्व सोपानराव वैराळे, रमेश सरागे,जयसिंग राठोड, नारायणराव जाधव,साहेबराव गुजर, वामनराव देशमुख ,उमाकांत चक्करवार, दयाराम जाधव , यशकुमार भरणे, अनिल डोंगरे, गजानन देशमुख, सोपानराव हरणे, प्रल्हादराव खडसे, विश्वनाथराव जोहरे, चंद्रकांत आठवले, दगडू कांबळे, सुधाकरराव चापके, चंद्रमणी गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती.
गोवर्धन मोहिते यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने धम्मसंगितीची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here