✍️ शार्दुल प्राचार्य प्रतिनिधी
7887325430
चिमूर : तालुक्यातील अडेगाव देश येथील दोन युवकांचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्या अपघात ग्रस्त कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी … म्हणून आज राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर यांनी भेट घेऊन
आर्थिक मदत केली
याबाबत अधिक माहिती अशी की, चिमूर तालुक्यातील अडेगाव देश येथील युवक विरापाल भगवान चौधरी व कार्तिक भगवान चौधरी या तरुणांचा कामावर जात असताना टाटा एस गाडीने धडक दिल्याने दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले झाले . घरातील करते धरते असणारे कमवते दोन्ही युवक असे काळाने घात घातला कुटूंब उघड्यावर पडले याची माहिती काँग्रेस कार्यकर्ते लटारू सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर यांना दिली असता आज अडेगाव देश येथे कुटुंबीयांची भेट घेऊन आधार देत आर्थिक मदत केली.या वेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जेष्ठ काँग्रेस नेते विवेक कापसे, चिमूर तालुका काँग्रेस कमिटी सचिव विजय डाबरे, काँग्रेस कार्यकर्ते लटारुजी सूर्यवंशी व गावकरी उपस्थित होते