Home यवतमाळ गो. सी. गावंडे महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

गो. सी. गावंडे महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

120

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 21जून) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. बी. एम सावरकर यांनी योगाचे महत्त्व सागितले.

प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाकरिता काही वेळ देऊन आपली शारीरिक व मानसिक क्षमता वृद्धिंगत करून निरोगी रहा आणि आनंदी राहा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व योगासन व प्राणायमाबद्दल माहिती देण्यात आली.

योग प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्पोर्ट्स व एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनानत संपन्न झाला. योग तज्ज्ञ डॉ. बी. एम. सावरकर , प्रो. डॉ. पी.वाय.अनासाने, एन.सी.सी. कॅप्टन प्रा.एस.एस. पाचकुडके, प्रा. डॉ. एस. पी. राठोड, प्रा. डॉ. के. बी. शिरसे , प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते, प्रा. डॉ. पी. डी. वंजारे, प्रा. डॉ. एस. डी. शिरगिरे, प्रा. डॉ. जी. बी. जाधव, प्रा. डॉ. नवीन जांभेकर, एन.सी.सी.सिनियर सचिन जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here