Home महाराष्ट्र दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी

दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी

76

 

चंद्रपूर – वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायत अंतर्गत शेगांव (खुर्द) हे पाणी टंचाईने अतिशय व्याकुळ असलेले गांव. अनेकवर्षांपासून पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून करून अखेर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तथा नळ योजना मंजूर झाली. परंतु पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायत जवळ सरकारी मालकीची जागा नसल्याने सदर योजना परत जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली.अखेर त्याच गावचे मूळ रहिवाशी, पेशाने शिक्षक,२००७ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरने आदर्श उत्कृष्ठ शिक्षक म्हणून सन्मानित केलेले, मराठा सेवा संघाच्या चळवळीत वाढल्याने नेहमीच समाजसेवेची उत्तकंठा असलेले,एक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सालेकर यांनी गावाचे हित लक्षात घेता, सामाजिक बांधिलकी जपत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाकरिता कसलाही आर्थिक मोबदला न घेता स्वतःच्या शेतातील ६२५ चौ.फूट जागा ग्रामपंचायतला दानपत्र करून बक्षिस दिली व रखडलेली योजना मार्गी लावली.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून त्यांचे आभार व्यक्त करत आहे.आपण गावाकऱ्यांना एकप्रकारे जलसंजीवणी देऊन छोटंसं समाजऋण फेडल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया रामचंद्र सालेकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here