चंद्रपूर -तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादीतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारातील काही संशियत उमेदवारांची चौकशी करा अशी आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्यां वतीने करण्यात आली.
जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी चंद्रपूर अंतर्गत सन २०२३ मद्ये तलाठी सेवा भरती राबविण्यात आली. अंतिम निवड यादी मद्ये नाम सदृष्याशा फायदा घेत अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गातून काही गैर आदिवासी उमेदवार लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.
सर्व पात्र उमेदवाराच्या जात वैध्यता प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी व मूळ आदिवासी उमेदवारास न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी टायगर सेना चे ऍड संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, ऍड जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, माजी सैनिक ड्रेफूल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर ह्यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.