धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद अंतर्गत वंजारी गावातील सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक शाळेत आज दिनांक रोजी 19/6/2024 सिकलसेल दिवस निमित्त सिकल सेल दिवस साजरा करण्यात आला ज्यात सिकलसेल चाचणी करण्यात आली . सिकलसेल आजाराबाबत व उपचाराबाबत विद्यार्थी ,शिक्षक , पालकांना माहिती देण्यात आली . तसेच ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम नुसार मुलांना रक्तक्षय होऊ नये त्याकरिता रक्तवाढीच्या Wifs
टॅबलेट आठवड्यातून एकदा गोळी खाऊ घालावी , गरोदर माता व किशोरवयीन मुला-मुलींना सिकलसेल आजाराबाबत डॉक्टर चैताली शहा वैद्यकीय अधिकारी सोनवद यांनी मार्गदर्शन केले तद्नंतर आरोग्य सहाय्यक सुधीर चौधरी , बि एन पवार यांनी प्रास्ताविक करत इतर मानवी आजाराबाबत माहिती प्रसंगी डॉ करण पाटील सर CHO यांनी स्वच्छतेबाबत व उपायोजना बाबत माहिती दिली . प्रसंगी स व पटेल माध्यमिक विद्यालय बोरखेडा – वंजारी येथील मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. उदय सर व डॉ.सुमेक्षा, श्री बनसोडे सर श्री पवन पाटील करोसिया सिस्टर सोनाली चौधरी आशाताई व जगदीश पाटील, बि एन पवार व सुधीर चौधरी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सिकलसेल बाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल उपस्थित पालकांनी व शाळेने समाधान व्यक्त करत आभार व्यक्त केले.