✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 18 जून) तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालय राहुन आरोग्य सेवा देत नाहीत. तालुक्यात 6 ते 7 प्राथमिक केंद्र असुन शासना स्तरावरून तेथे नियुक्तीवर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असुन त्यांना उपकेंद्र निहाय शासकीय निवास्थान उपलब्ध असुन देखील ते तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करीत करतात
या बाबीकडे तालुका अधिकारी यांची देखील अक्षम्य दिरंगाई व कसुर असल्याचे दिसुन येते.
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा नियमित व सतत पुरविण्याचे दृष्टीने शासन स्तरावर काटोकाट मोठया प्रमाणात प्रयत्न केल्या जाते.
परंतु संबंधीत आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे सध्या परीस्थीतीत पावसाळयाचे दिवस असुन रोगराई साथरोग हे मोठया प्रमाणावर होत आहेत.
उपकेंद्र निहाय स्थानिक पातळीवर ग्रामीण भागातील जनतेवर आरोग्य विषयक सेवा पुरविण्यास सदर यंत्रणा नियुक्त केल्याचे चित्र सध्या परीस्थितीत तालुक्यात निर्माण झाले आहे.
तरी आपण संबंधीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालय राहुन आरोग्य सेवा पुरविण्याचे सक्तीचे आदेश देण्यात यावे.
सदर प्रकरणी आपण जातीने या गंभीर प्रकरणी लक्ष देण्यात यावे व तसेच संबंधीतावर उचित कार्यवाही करण्यात यावी.
असे तक्रारी निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.कार्यालय, यवतमाळ यांना ईमेल मार्फत शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना,यवतमाळ) यांनी केले आहे.