अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-जगातले सर्व धर्म एकात्मतेची शिकवण देतात. संत महात्म्यांनी सुध्दा बंधुत्वाचे संस्कार दिले आहेत. तरीही काही लोक धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडत असतात. अशा विघातक कृत्यांना कोणीही बळी पडता कामा नये. कारण, आपला भारत हा अठरा पगड जातीधर्माचा एकात्मिक देश आहे. त्यामुळे जाती आणि धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते, असे प्रतिपादन गंगाखेडचे रासप आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
शहरातील क्रोदी रोड येथील जुना ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी रमजान ईद निमित्त ईद उल अजहा ही नमाज अदा केली. त्यावेळी संपन्न झालेल्या शुभेच्छा कार्यक्रमात आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित राहून सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, सामाजिक एकात्मेसह, प्रेम, दया, समता, बंधुता या मानवी मूल्यांची शिकवण देणारा बकरी ईद हा महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा देशभर साजरी केली जाते. तसेच जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते. त्यामुळे या सणाचे महत्त्व लक्षात घेवून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाची भावना वाढवावी.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस उपअधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पोलीस निरीक्षक दिपक वाघमारे, मित्रमंडळाचे शहर अध्यक्ष सय्यद अकबर, राजू खान, शेख खालेद यांच्यासह बहुसंख्य मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महाराष्ट्र अलिंगन देत दिल्या ईदच्या शुभेच्छा : राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढविण्याचे...