✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
पुसद :- (दि. 17 जून) युवा ग्रामीण पत्रकार संघाचे
येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये राज्य अधिवेशन होणार असून त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आज पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत धावती भेट घेण्यात आली.
या भेटीमध्ये पुढील होणाऱ्या अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा सकारात्मक चर्चा करून संवाद साधण्यात आला.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे काम हे दिवसेंदिवस वाढत असून त्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून निघाला आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गाव सर्कल तालुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये
युवा ग्रामीण पत्रकार संघटना उभारी घेत आहे.
त्याचबरोबर युवा ग्रामीण पत्रकार संघाची वाढती सदस्य संख्या बघता देशातील प्रत्येक राज्यामध्ये कार्यान्वित होणार असून त्याही अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.
राज्य अधिवेशन संपल्या बरोबर देश पातळीवर युवा ग्रामीण पत्रकार संघ उभारी घेणार असून सर्वच पत्रकार बांधवांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटना मुख्य उद्देशाच्या हेतूने मार्गक्रमण करीत आहे.
त्यामुळेच साप्ताहिक वर्तमानपत्र डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी यांचा संघटने मध्ये येण्याचा कल वाढीस लागला आहे.पत्रकाराच्या प्रत्येक समस्येला सोडवण्यासाठी आत्मनिर्भर होऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाने प्रतिज्ञा केली असून देश पातळीवर शसुद्धा ही संघटना वाढीस लागलेली आहे.
राज्य अधिवेशन संपताच देशाच्या प्रमुख राज्यांमध्ये विभागीय आढावा बैठक घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघटना देशाच्या राष्ट्रीय पातळीवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे.
विशेष संघटनात्मक बाबी सह विविध विषयाच्या अनुषंगाने आज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्या शी पुढील राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वच पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन संवाद साधला.
या आढावा बैठकीला प्रमुख उपस्थिती युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर, यवतमाळ जिल्हा सचिव राजेश सोनुने ,जिल्हा सरचिटणीस प्रशांत देशमुख, पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड, ग्रामीण पुसद तालुका अध्यक्ष राजेश ढोले, पुसद कार्याध्यक्ष विजय निखाते, पुसद तालुका सचिव कुलदीप सुरवसे, पुसद तालुका सहसंघटक ज्ञानेश्वर मेटकर, ज्येष्ठ पत्रकार मारोतराव कांबळे पुसद ग्रामीण सर्कल चे श्रीकांत राठोड इत्यादी पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती होती.