✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड : – (दि. 17 जून) तालुक्यातील चुरमुरा येथे आज सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाउस होऊन त्यामध्ये चुरमुरा गावातील समाधान फुलसिंग राठोड हा युवक गावातील शेळ्या राखणीने चारत होता.
सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान तो शेळ्या शेतात चारत असतांना हवा व पाउस येत असलयाने सर्व शेळया झाडाखाली आसऱ्याला थांबल्या होत्या.
त्या झाडावर वीज पडून झाडाखाली असलेल्या तेवीस शेळ्या जागीच ठार झाल्या.
परंतु समाधान राठोड हा झाडापासून दूर उभा असल्याने त्याची जीवित हानी टळलीही.
ही खबर गावातील लोकांना कळताच चुरमुरा गावात एकच खळबळ उडाली आणि त्या शेळ्यांना पाहण्याकरता गावातील लोकांची गर्दी झाली.