धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – धरणगाव शहरातील लहान माळीवाडा येथील दैनिक तरूण भारत चे जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी सन२०२३-२४ ह्या आर्थिक वर्षांत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक रविंद्र लढ्ढा यांचा हस्ते व सचिव श्री नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, सहाय्यक व्यवस्थापक गायत्री कुळकर्णी, याचा सह विविध पदाधिकारी चा प्रमुख उपस्थित गौरव करण्यात आला.
सदर दि. ८ जुन, २०२४ रोजी दैनिक तरूण भारत ची जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न झाली त्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादासह विविध शहरातील विषेश प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार महाजन हे ४ जुन १९९८ पासुन म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांपासून दैनिक तरूण भारत काम करीत आहेत.
मी केलेली निर्भीड पत्रकारिता याचा हा सन्मान आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. यापुढे देखील मी पत्रकारिता क्षेत्रात अविरत काम करेल असे प्रतिपादन महाजन यांनी केले.