_इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद किंवा बलिदानाचा सण १५ जून शनिवारपासून सुरू झालाय. प्रेषित इब्राहिम यांना अल्लाहसाठी आपल्या मुलाचा बळी द्यायचा होता. पण अल्लाहने त्यांना रोखलं आणि आपल्या मुलाऐवजी मेंढीची कुर्बानी देण्यास सांगितल्याचं मुस्लीम धर्मातील लोक मानतात. मेंढीच्या अभावामुळे पुढे बेकरीची कुर्बानी देण्यात येऊ लागली. आतातर प्राण्यांचे बळी देणे एक अंधश्रद्धा ठरत असल्याने ते पूर्णपणे बंदच व्हायला पाहिजे. श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा डोळे उघडण्यास लावणारा सदर लेख… संपादक._
इस्लाम धर्मातील त्यागाच्या पवित्र भावनेचा उत्सव बकरी ईद आज १५ जून २००४पासून साजरा केला जात आहे. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित असून कुर्बानीचा खरा अर्थ एक असे स्वतःचे बलिदान, स्वतःच्या अतिप्रिय वस्तूचे बलिदान जे इतरांसाठी करण्यात येते. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर अंदाजे ७० दिवसानंतर बकरी ईद साजरी केली जाते. धर्माची मान्यता आहे की बकरी ईदच्या दिवशी खुदासाठी बकरीचा बळी दिला जातो. असे मानले जाते की बकरी ईदच्या उत्सवाची सुरुवात हजरत इब्राहिमपासून सुरु झाली. जे अल्लाहचे पैगंबर होते. इब्राहिम अलैय सलाम यांना अल्लाहने आपला प्रिय मुलगा इस्माईल अल्लाहच्या मार्गाने बलिदान देण्याचे स्वप्न दिले होते. ही इब्राहिमांची परीक्षा होती, ज्यात एका बाजूला त्याच्या मुलावर प्रेम होते आणि एकीकडे अल्लाहची आज्ञा होती. इब्राहिम यांनी केवळ आणि केवळ अल्लाहची आज्ञा पाळली आणि अल्लाहला संकेतावरुन आपल्या मुलाचे बलिदान देण्यास मान्य केले. अल्लाह रहीम करीम आहे आणि त्यांना हृदयाची स्थिती माहित आहे. जसे इब्राहिम आपल्या मुलाचा बळी देण्यास सुरूवात करतात, तेव्हा फरिश्तांचे सरदार जिब्रील अमीन इस्माईलला सलामला चाकूच्या खालून काढून त्याच्या जागी एक कोकरू ठेवले. अशाप्रकारे इस्लाम धर्मात हजरत इब्राहीम यांच्याद्वारे पहिली कुर्बानी देण्यात आली. यानंतर जिब्रिल अमीन यांनी इब्राहिम यांना चांगली बातमी सांगितली की अल्लाहने आपलं बलिदान स्वीकारले आहे. मात्र याचा गुह्य अर्थ बाजुलाच पडला की स्वकुर्बानी हवी आहे, आत्मसमर्पण पाहिजे, आपले संपूर्ण जीवन समर्पित भावनेने जगले पाहिजे, इतरांना सेवा, आदर, सत्काराने वागवले पाहिजे.
दरवर्षी साजरा होणार्या बकरी ईद सणाच्या निमित्ताने ज्या बकरीची कुर्बानी दिली जाते त्याच्या मांसाला तीन भागात विभागले जाते कारण हा सल्ला शरीयतमध्ये आहे. एक भाग गरिबांमध्ये वाटून घ्यावा, दुसरा भाग मित्र आणि नातेवाईकांसाठी आणि तिसरा भाग आपल्या कुटुंबासाठी ठेवला जावा. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर जवळपास ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. या सणाला ईद-उल-जोहा असंही म्हटलं जातं. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचं महत्त्व आहे. पण विचारवंतांच्या मते स्वतः बली जाणे, स्वतःचे समर्पण किंवा स्वतःची अतिप्रिय वस्तू समर्पित करणेच खरी कुर्बानी होय. कितीही लाडीगोडीने पाळलेले पशूपक्षी, प्रिय पत्नी, मुले, आईवडिल, कितीही मोठी किंमत मोजून एखादं जीव खरेदी केले, तरी ती आपली प्रिय वस्तू ठरू शकत नाही. प्राणीप्रेमींचा दावा आहे की, आपले अतिप्रिय आपले शरीरावयव नाक, कान, डोळे, हात, पाय, मान अर्थात काया, वाचा व मन हे आहेत. त्यांची कुर्बानी अल्लाहला जास्त पसंत पडेल. पण कायद्याने तोही गुन्हाच ठरतो, स्वतःचा जीव गमावू पाहणाराही शास्त्रांप्रमाणे आत्महत्यारा ठरतो. दयाळू कृपाळू अल्ला ताला एखाद्या निष्पाप जीवाची कुर्बानी कशी काय स्वीकारेल? सारी कायनात, जीवसृष्टी निर्माणकर्ता परमेश्वर, अल्लाह, प्रभू एकच आहे. त्याने निर्मित वस्तू आपली समजून त्यालाच समर्पित करणे, हा कुठला आला न्याय? जन्मदात्यांसमोर त्यांच्याच अपत्याला चिरून फाडून रक्तमांस खाऊ घातल्याने ते खूश- प्रसन्न होतील काय? असा सकारात्मक विचार स्वतःला फार मोठे आध्यात्मिक धर्ममार्तंड समजणार्या प्रभूप्रेमी, अल्लाहप्रेमी, भगवदभक्तांना का उमजत नाही?
भारतात सोमवारी १७ जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. रमजान महिन्यात तीस दिवस उपवास करून रमजानची ईद साजरी केली जाते. तर बकरीर महिन्यात जवळपास दहा उपवास काहीजण करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरा कुर्बान करून त्याचं मटण नातेवाईकांमध्ये आणि काही गरीब लोकांमध्ये वाटण्यात येतं. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. ही फार मोठी अंधश्रद्धा, नासमजीची आणि बेअक्कलेची गोष्ट आहे.
इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना वयाच्या ९०व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती. अल्लाहने एकदा इब्राहिम यांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची ठरवली. इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी त्यांच्या सर्वांत प्रिय गोष्टीचं बलिदान द्यायला सांगितलं. यावर इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगा इस्माईलचं बलिदान द्यायचं ठरवलं. इब्राहिम त्यांच्या मुलाची कुर्बानी देणार होतेच, इतक्यात अल्लाहने इस्माईलच्या जागी एक बकरा ठेवला. अल्लाह फक्त इब्राहिमची परीक्षा घेत होते. या परंपरेची आठवण म्हणून जगभरातील मुस्लीम ईद-उज-जोहा किंवा ईद-उल-अझहा साजरी करतात. या दिवशी बकरीची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात याला बकरी ईद असे म्हणतात. ही ईद हजशी संबंधित आहे. या दिवशी जगातील लाखो मुस्लीम पवित्र मक्का शहराला भेट देतात. बकऱ्याची कुर्बानी देणं हा हजच्या यात्रेतील महत्त्वाचा भाग असतो. प्राणी-पक्षी यांचा बळी, कुर्बानी देणे खरेच आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातील प्रगतशील मानवास शोभत काय? याचा सारासार विचार करणे काळोचित आहे…
!! इद-उल-अजहा निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
एक प्राणीप्रेमी- श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.