Home महाराष्ट्र बालमनाला साजेश्या गंपूच्या गोष्टी-उमेश घेवरीकर

बालमनाला साजेश्या गंपूच्या गोष्टी-उमेश घेवरीकर

122

 

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – *पुढची पिढी सक्षम व्हायची असेल तर वाचन लेखन महत्त्वाचे आहे, वाचनातून वैचारिक समृद्धी मिळते, ही समृद्धी मिळवून देण्यासाठी शब्दगंध चे प्रयत्न महत्त्वपूर्ण असून गौरव भुकन सारख्या बाल साहित्यिकांचे पुस्तक प्रकाशित करून पुढच्या पिढीला वैचारिक वारसा मिळवून देण्याची शब्दगंध ची भूमिका अत्यंत गौरवास्पद आहे* असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उमेश घेवरीकर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने चांदबिबी महाल परिसरात बाल साहित्यिक ‘गौरव भुकन याच्या ‘गंपूच्या गोष्टी’ या विनोदी कथासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ चित्रकार प्रा.रवींद्र सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शेवगावचे माजी सभापती बापूसाहेब भोसले, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, शरद धलपे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.उमेश घेवरीकर म्हणाले की, गौरव भुकन याने गंपू हे काल्पनिक पात्र मोठ्या खुबीने रंगवून बाल कथांचासंग्रह वाचकांना खिळवून ठेवील असा निर्माण केला आहे. कोणत्याही प्रकारचे अभिनिवेश न ठेवता बाल मनाला साजेश्या पद्धतीने तो व्यक्त झाल्याने हे पुस्तक खऱ्या अर्थाने बाल वाङमय म्हणून निश्चितच पुढे येईल.
यावेळी बोलताना गौरव भुकन म्हणाला की, गंपूच्या गोष्टी ऐकणाऱ्या माझ्या सर्व दोस्त मंडळी आणि आईने मला पाठबळ दिल्याने हे पुस्तक आपल्या समोर शब्दगंध च्या माध्यमातून येत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र सातपुते म्हणाले की, बालकांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू बागडू दिल्यास त्यांच्यातील क्रियाशीलता दिसते,गौरव भुकन यास त्याच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी त्याच्या मनात घर करून राहिल्या आणि त्यामुळेच त्यानी आपल्या कल्पना विश्वात रमून गंपूच्या गोष्टी लिहिल्या. बाल साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम शब्दगंध कडून होत आहे,ही अतिशय चांगली गोष्ट आहे.आज वाचक, लेखक, चित्रकार, पत्रकार, कवी, साहित्यिक आणि रसिकांचाही खऱ्या अर्थाने गौरव होत आहे.
यावेळी प्राचार्य जी.पी.ढाकणे, डॉ. अशोक कानडे, प्रशांत वाघ, सुजित वाघ यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी सुरेखा घोलप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.
यावेळी शाहीर भारत गाडेकर. बबनराव गिरी, सुजाता पुरी,वर्षा भोईटे, शर्मिला रणधीर, भगवान राऊत, जयश्री राऊत,संगीता गिरी, अविनाश पांढरे, तारा सातपुते, मीरा अकोलकर,अथर्व धर्माधिकारी,पृथ्वी सुपेकर, प्रसाद बनसोडे, सरोज अल्हाट, कविता घोलप, कृष्णा बेलगावकर, नीता वाघ, संगीता बोरुडे, संध्या पावसे, योगेश्वर बोरुडे,अर्जुन डावरे, निवृत्ती गर्जे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वानंदी भरताल, तुषार गिरमकर व गौरव भूकंन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वांनी गप्पा टप्पा, कथा कविता, गाणी सादर करत करत घरून आणलेल्या डब्यावर ताव मारत वनभोजनाचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here