Home लेख प्रेमळ बाबांना समजून घ्याहो! (आंतरराष्ट्रीय पितृदिन विशेष.)

प्रेमळ बाबांना समजून घ्याहो! (आंतरराष्ट्रीय पितृदिन विशेष.)

104

 

_फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. वडील आणि मुलांचे नाते हे खूप वेगळे असते. फादर्स डे हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे हा दिवस साजरा केला जातो._

या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. फादर्स डेची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन १९ जून १९०९मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात मुलगी सोनोरा डॉडने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना सन १९१०मध्ये सुरु झालेल्या मदर्स डेपासून मिळाली. अध्यक्ष लिंडन बी.जॉन्सन यांनी सन १९६६मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार १९ जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. बर्‍याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. कसा करावा साजरा पितृदिन? तर मातृदिन प्रमाणे पितृदिनही जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फादर्स डेला मुलं आपल्या प्रेमळ वडिलांना खास भेटवस्तू देतात आणि आनंद आणि उत्साहात त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. नुकतंच पितृत्व लाभलेल्या पित्यासाठी फादर्स डे खूप महत्त्वाचा असू शकतो. असे नवपिता या दिवशी स्वतःच्या वडिलांकडून पितृत्वाचे धडे घेऊ शकतात. कारण आईप्रमाणे बाबा होणं हीदेखील एखाद्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना असू शकते. या खास दिवशी तुमच्या लाडक्या बाबांसोबत ऑनलाईन माध्यमातून तुम्ही फादर्स डे साजरा करू शकता. पितृदिनाचा संबध हा थेट मातृदिनाशी आहे. कारण सर्वात प्रथम जगभरात मातृदिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. मातृदिनाचा इतिहास सन १८६० या दशकाशी संबधित आहे. अमेरिकेत १९१४सालापासून मातृदिनासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येऊ लागली. मात्र यामुळे पितृदिन साजरा करण्याची मागणी होऊ लागली. कारण जर एका पालकासाठी एखादा खास दिवस साजरा केला जात असेल तर दुसऱ्या पालकाचाही या आनंदावर तितकाच हक्क आहे. ज्यामुळे पुढे ५ जुलै १९०८मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये फादर्स डेसाठी ३६२ पित्यांचा सन्मान करण्यात आला. हे सर्व पिता आधीच्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात मरण पावले होते. अशा पद्धतीने पितृत्वाचा सन्मान करणारा फादर्स डेसाठी पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पितृदिन हा पितृत्व आणि पितृत्वाच्या बंधनांचा तसेच समाजातील वडिलांच्या प्रभावाचा सन्मान करण्याची सुट्टी आहे. युरोपातील कॅथोलिक देशांमध्ये, मध्ययुगापासून १९ मार्च हा सेंट जोसेफ डे म्हणून साजरा केला जात आहे. युनायटेड स्टेट्समध्ये फादर्स डेची स्थापना सोनोरा स्मार्ट डॉड यांनी केली आणि सन १९१०मध्ये पहिल्यांदा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला गेला. हा दिवस जगभरात विविध तारखांना आयोजित केला जातो आणि विविध प्रदेश पितृत्वाचा सन्मान करण्याच्या त्यांच्या स्वतःच्या परंपरा राखतात. फादर्स डे हा लिथुआनिया आणि स्पेनच्या काही भागांमध्ये एक मान्यताप्राप्त सार्वजनिक सुट्टी आहे आणि सन १९७७पर्यंत इटलीमध्ये असे मानले जात होते. एस्टोनिया, सामोआ आणि दक्षिण कोरियामध्ये ही राष्ट्रीय सुट्टी आहे, जिथे तो पालक दिन म्हणून साजरा केला जातो. ही सुट्टी कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करणाऱ्या अशाच समारंभांना पूरक आहे, जसे की मदर्स डे, सिबलिंग डे आणि आजोबा दिवस. कॅथोलिक युरोपमध्ये पितृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक प्रथागत दिवस किमान सन १५०८पासून ओळखला जातो. सामान्यतः १९ मार्च रोजी सेंट जोसेफचा मेजवानी दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्यांना कॅथलिक धर्मात पितृ पोषणकर्ता डोमिनी- लॉर्डचे पोषणकर्ता आणि दक्षिण युरोपीय परंपरेत येशूचे पुष्ट पिता म्हणून संबोधले जाते. हा उत्सव स्पॅनिश आणि पोर्तुगीजांनी अमेरिकेत आणला होता. कॅथोलिक चर्चने १४व्या शतकाच्या शेवटच्या वर्षांपासून किंवा १५व्या शतकाच्या सुरुवातीपासून सेंट जोसेफ डेवर पितृत्वाचा उत्सव साजरा करण्याच्या प्रथेला सक्रियपणे समर्थन दिले, उघडपणे फ्रान्सिस्कन्सच्या पुढाकाराने. कॉप्टिक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सेंट जोसेफ डेवर पितृत्वाचा उत्सव देखील साजरा केला जातो, परंतु कॉप्ट्स हे २० जुलै रोजी पाळतात. कॉप्टिक उत्सव पाचव्या शतकातील असू शकतो.
हा दिवस जगभरात साजरा करायचा की नाही हा वादाचा विषय राहिला. सन १९०८मध्ये ग्रेस गोल्डन क्लेटन यांनी अमेरिकेतील खाण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी हा दिवस प्रस्तावित केला. तेव्हा ते स्वीकारले गेले नसले तरी, सन १९०९मध्ये सोनोरा स्मार्ट डाॅड, ज्याला तिच्या पाच भावांसह तिच्या वडिलांनी एकट्याने वाढवले होते, चर्चमध्ये मदर्स डेला उपस्थित राहिल्यानंतर स्पोकेन मिनिस्ट्रियल असोसिएशनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यास राजी केले. फादर्स डे व्यतिरिक्त, अनेक देशांमध्ये १९ नोव्हेंबर रोजी पुरुष आणि मुले यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच फादर्स डे. फादर्स डेची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन १९ जून १९०९मध्ये साजरा केला गेला होता. वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी फादर्स डे साजरा करतो. खरंतर फादर्स डेची तारीख वर्षानुवर्ष बदलत असते. फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.फादर्स डे प्रत्येक देशांत एकाच दिवशी साजरा केला जात नाही. फादर्स डे भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो, तर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये, पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह इतर देश १९ मार्च रोजी फादर्स डे साजरा करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यामध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.
सन १९१६मध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी या दिवसाला जागतिक स्तरावर साजरा करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर सन १९२४मध्ये राष्ट्रपती कॅल्विन कुलिज यांनी या दिवसाला एक राष्ट्रीय आयोजन म्हणून घोषित केलं. त्यानंतर सन १९६६मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सन १९७२मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी पहिल्यांदा या दिवसाला अधिकृतरित्या साजरा करण्याची घोषणा केली. खरंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या आईसाठी मदर्स डे साजरा करतो त्याप्रमाणेच आपले वडिलही आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी मुलं आपल्या वडिलांसाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. त्यांना भेटवस्तू देतात. थोडक्यात आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. बऱ्याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. मात्र, या दिवशी आपण बाबांविषयी असणाऱ्या आपल्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करु शकतो. म्हणूनच या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. प्रत्येक देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जावा, अशी या लेखप्रपंचाच्या माध्यमातून अपेक्षा!
!! जागतिक वडिल दिनाच्या समस्त पुत्र-पुत्रींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here