Home यवतमाळ उमरखेड मध्ये वंचितच्या मतदानाला महाविकास आघाडीचा तुरुंग!

उमरखेड मध्ये वंचितच्या मतदानाला महाविकास आघाडीचा तुरुंग!

306

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 16 जून)
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा लाखाच्यावर मताधिक्क्याने पराभव केला.

तर वंचित चे डॉ. बी. डी. चव्हाण यांनी दीड लाखाच्या वर मतदान घेतले, उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला जनतेने पहिल्या क्रमांकाची पसंती दिली.

महायुतीला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली तर वंचित बहुजन आघाडीने 19 तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली

एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात असे जरी असले तरी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या उमरखेड शहरात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदानाला महाविकास आघाडीने सुरुंग लावल्याचे दिसले.

उमरखेड शहरात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीने 11774 मते घेत आघाडी घेतली, तर महायुती 9309मग ते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहीली वंचित चा मात्र यावेळी उमरखेड शहरात फारसा प्रभाव दिसलाच नाही वंचितला केवळ 418 मतांवर समाधान मानावे लागल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदानाला महाविकास आघाडीने सुरुंग लावण्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
या उलट ग्रामीण भागात मात्र अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवाराने चांगले मते मिळाल्याचे दिसले.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक सुरुवातीला तिरंगी होईल असे मत जाणकार व्यक्त करीत होते, परंतु वंचित चा नियोजन शून्य प्रचार , कार्यकर्त्याची नसणारी फळी, पक्षा बाहेरील
कार्यकर्त्यांना नियोजनाची दिलेली जबाबदारी, दुखावलेला निष्ठावान कार्यकर्ता, ना सभा, ना रॅली या मुळे उमरखेड मध्ये वंचित ची हवाच दिसली नाही. त्यामुळे ही लढत दुरंगी झाली. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 22 हजारांच्या वर मतदान घेतले होते.

या निवडणुकीत हा आकडा 19 हजारावर येऊन पोहोचला यातही यंदा या मतदारसंघात डॉ बी डी चव्हाण यांना बऱ्याच प्रमाणात बंजारा आणि मायक्रो ओबीसी यांचे मतदान झाल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे वंचित आघाडीचे पारंपरिक मते आपल्याकडे खेचून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पारंपरिक मतदानाला सुरुंग लावल्याचे बोलल्या जात आहे.

एकंदरीत वंचित फॅक्टर यावेळी प्रभावी कामगिरी करू न शकल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी, महायुती असाच सामना होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here