Home महाराष्ट्र नवीन शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत….

नवीन शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत….

186

 

जिंतूर (प्रतिनिधी- सौ. अश्विनी जोशी) उन्हाळी सुट्टीनंतर दि. 15/06/2024 रोजी नव्याने सुरू होणाऱ्या 2024-2025 या शैक्षणिक वर्षाचे तालुक्याच्या शिक्षण विभागाने जल्लोषात स्वागत केल्याचे पहावयास मिळत आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून शिक्षण विभाग नियोजनबद्धपद्धतीने ॲक्टिव मोडमध्ये दिसत आहे. सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी “दर्जेदार पोषण आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण” हे ध्येय मागील वर्षाप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

या शैक्षणिक वर्षात वैविध्यपूर्ण उपक्रम शाळा, केंद्र व तालुका स्तरावर राबविण्यात येणार आहेत. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व मुख्याध्यापकांच्या दोन ऑनलाईन सहविचार सभा घेण्यात आल्या. यामध्ये शाळा पूर्वतयारी कामकाज, शाळा पूर्व तयारी मेळावा, पाठ्यपुस्तक वाटप नियोजन, शैक्षणिक उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील सर्व शाळेमध्ये शाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर पासून स्वच्छता, साफसफाई व सुशोभीकरण करण्यात आले. सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे दि. 15/06/2024 रोजी नवागतांचे व पहिल्या दिवशी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक शाळांमध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभाला शैक्षणिक कामकाजाची पाहणी करण्यासाठी तालुक्यामध्ये शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार स्वतः गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी रिडज व चांदज येथे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, मंगेश नरवाडे यांनी वर्णा व भोसी येथे, तर सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती यांच्यासह सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेने शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळेमध्ये भेटी केल्या आहेत. या शाळाभेटी मधून शाळा, शालेय परिसराची स्वच्छता, शिक्षक-विद्यार्थी उपस्थिती, प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनाचे कार्य, शालेय पोषण आहार अंमलबजावणी या बाबीची पाहणी करण्यात आली. एकंदरीत तालुक्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here