महागांव-किशोर राऊत
महागाव -कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालकाना आता भ्रष्टाचाराचा साक्षात्कार झाला असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. सन२०१९ ते २०२२ या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार काही संचालकानी जिल्हा निबंधक यांचेकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे ज्या संचालकानी तक्रार केली त्यातील दोन संचालक या आधी सुध्दा संचालक पदावर होते. भ्रष्टाचाराचा आरोप करणारे हेच खरे भ्रष्टाचाराचे खरे सुत्रधार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी केली होती, त्यावेळी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करण्यासंदर्भात एक वेळ नव्हे तर लागोपाठ तीन वेळा उपोषणसुध्दा केले होते. त्यावेळी आरोप करणारे संचालक उर बडवून भ्रष्टाचार झाला नसल्याबाबत जगजाहीरपणे सांगत सुटले होते, एवढेच नव्हे तर उपोषणकर्त्यांना बदनामीकारक दुषण लावत होते तरीही उपोषणकर्त्यांनी ऊपोषण करून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी प्राणांतिक उपोषण केल्यानंतर जिल्हा निबंधकानी भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती. चौकशी समिती प्रमुख सुनिल भालेराव योग्य पध्दतीने व नि:पक्षपातपणे चौकशी करीत होते या भ्रष्टाचाराने आपले बिंग फुटेल म्हणून चौकशी मध्ये खोडा आणुन याच भ्रष्टाचारी संचालकानी चौकशीला स्थगिती मिळावी, यासाठी सचिवामार्फत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती याचे कडे दि.३१-१-२००० ला याचिका दाखल करुन चौकशीला स्थगिती दिली गेली होती, एवढेच नव्हे तर कषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची याचिकासुध्दा महागांव येथिल न्यायालयात एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली होती परंतु भ्रष्टाचार करण्यात तरबेज असणारे संचालक आता मात्र भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड करीत आहेत. वास्तविक पाहता याच संचालकानी कृषी उत्पन्न बाजार समिती अवसायानात आणली असुन कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराने डबघाईस आणुन कृषी उत्पन्न बाजार समिती आता अखेरच्या घटका मोजत असुन कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या हिताची न रहता अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी संचालकासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली होती या भ्रष्टाचार संचालकात एक उच्च विद्या विभुषित वकील असुन दुसरा संचालक एका महाविद्यालयाचा अध्यक्ष व एका वित्त सहकारी संस्थेचा अध्यक्ष असुन त्यांची भ्रष्टाचाराची लालसा मोठ्या प्रमाणात असल्याने या दोनही महाभ्रष्टाचारी संचालकानी कृषी उत्पन्न बाजार समिती ची माती केली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पैशावर मौजमजा करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पैसे घेवुन अभ्यास दौऱ्याच्या नावावर पैशाची उधळपट्टी केली आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला नौकराची गरज नसताना सूध्दा आपल्या अधिकारात नौकरीवर घेतलेल्या नोकराकडुन १५ते २० लाख रुपये देणगी घेवुन नोकराची भरती करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असुनही हेच संचालक आता साळसूद पणाची भुमिका घेत भ्रष्टाचार झाल्याचा कांगावा करीत आहेत या संचालकानी त्यावेळी भ्रष्टाचार झाला असताना व तत्कालिन वेळी केवळ निष्कंलंकीत कार्यकर्त्यांना दुषण लावणारे यांना आता भ्रष्टाचाराचा साक्षात्कार झाला का?अशाप्रकारचे नाना प्रश्न शेतकऱ्यासह जनता विचारीत आहेत या संचालकाना कृषी सचिवानी पैसे दिले नसल्यास क्षणाचाही विलंब न लावता भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड करतात भ्रष्टाचार झाला त्यावेळी उपोषण कर्त्यांना याच भ्रष्टाचारी संचालकानी आपले ज्ञान पाजळत व आकलेचे तारे तोडत माहीती देण्यास सचिवाला सांगुन मज्जाव केला होता आतामात्र या संचालकांना कसा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या बाबत पुळका आणुन भ्रष्टाचार झाला असल्यबाबत सांगत सुटले आहेत महागांव येथिल उपोषण कर्त्यासह तालुक्यातील शेतकरी दूधखुळे नसुन आपला भ्रष्टाचारी वृतीचा प्रताप आता जनतेला पुर्णपणे समजला असुन ज्या उपोषण कर्त्यावर आरोप व दुषण लावली त्यातील काही उपोषण कर्ते सक्रीय झाले असुन सदर संचालकाचा कार्यकाळात भ्रष्टाचार झाला त्याबाबतीत कार्यकर्ते शोध घेत आहेत. तसेच त्यांच्या वित्त सहकारी संस्था आहेत. तेथिल भ्रष्टाचार उघड करण्याच्या तयारीला लागले आहेत तथा कुठे पदावर होते त्यांचे कार्यकाळातील भ्रष्टाचार उघड करून त्याचेवर कार्यवाही करण्याची मागणी करणार आहेत.