Home शैक्षणिक अनपेक्षित निवासस्थानी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराने भारावली उर्मिला डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सिद्धार्थ...

अनपेक्षित निवासस्थानी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराने भारावली उर्मिला डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सिद्धार्थ नेतकरांनी केला सत्कार

193

 

प्रतिनिधी –

जळगांव – उर्मिला रवींद्र पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करून जळगावच्या अभिनव विद्यालयात सन २०२३ / २४ शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्ता सिद्ध करून यशोपताका फडकावली.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे उर्मिला हिचा सत्कार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते निवासस्थानी जाऊन शुक्रवार दि.३१ मे २०२४ रोजी करण्यात आला.अपेक्षित उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे उर्मिला आनंदोर्मींनी भारावून गेली ! नेतकर साहेबांनी शाल व अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील मोटिव्हेशनल पुस्तक देऊन उर्मिलाचा भावपूर्ण सत्कार केला.पुढील शिक्षणाच्या संदर्भात नेतकर यांनी उर्मिलाशी अनौपचारिक चर्चा करीत मार्गदर्शन केले.सत्कार संयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी उर्मिलाच्या अभ्यासाची पद्धत,आवडीनिवडी आणि मिळालेल्या स्पर्धात्मक यशाबद्दल कौतुक केले.तुझ्या यशाचे श्रेय तू कुणाला देशील ? या प्रश्नाचे उत्तर देतांना उर्मिला म्हणाली की माझ्या यशाचे श्रेय मी माझी मातोश्री सौ.अनिता रविंद्र पाटील यांना देईन आणि त्यानंतर मुख्याध्यापिका सरोज तिवारी मॅडम आणि माझ्या वर्गशिक्षिका नीता पाटील मॅडम यांनाही मी आवर्जून देते.या शैक्षणिक वर्षात माझ्या सगळ्या इच्छा – आकांक्षा तसेच हट्ट पूर्ण करून मला सदैव आनंदी ठेवून योगदान देणाऱ्या माझ्या वडिलांशिवाय या यशाची आलेख कसा उंचावला असता ? हा प्रतिप्रश्न विचारून उर्मिलाने सर्वांना स्तिमित केले ! सत्कार प्रसंगी उर्मिलाचे पिताश्री तथा पत्रकार रवींद्र पाटील,मातोश्री अनिता पाटील,वडिलांचे परमस्नेही लालचंद अहिरे उपस्थित होते.लालचंद अहिरे व संयोजक विजय लुल्हे यांनीही उर्मिला पाटील हिचा विशेष सत्कार करून गौरव केला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उर्मिला हिस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here