Home यवतमाळ भीम आर्मी कडुन मनुस्मृतीचे दहन व जाहीर निषेध

भीम आर्मी कडुन मनुस्मृतीचे दहन व जाहीर निषेध

178

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद:भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सितारामजी गंगावणे यांनी काढलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मनुस्मृतीचे दहन भीम आर्मी भारत एकता मिशन कडून करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या वार्षिक शालेय अभ्यासक्रम २०२४-२५ पासून पाठ्यपुस्तकात मनुस्मृती मधील काही श्लोक घेऊन जो धार्मिक वृत्ती पसरण्याचे काम व बहुजन समाजात धार्मिक षडयंत्र पसरविण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यांच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटणेने दि.१ जून रोजी सकाळी ११ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुसद येथे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यासमेत महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, मनुस्मृतीचा धिक्कार असो, असे गगनभेदी घोषणा देऊन रोष व धिकार व्यक्त करत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी कणखर शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आम्ही मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात येऊ देणार नाही जर आले तर भविष्यात आक्रमक उपोषण आंदोलने करू. असे सांगितले यावेळी उपस्थित धनराज कांबळे जिल्हा महासचिव, वैभव सूर्यवंशी तालुका संघटक, अजय लोखंडे तालुका उपाध्यक्ष, करण खंदारे, निर्भय गायकवाड, संतोष दुधडे, विनोद कांबळे, अभिजीत बलखंडे,आकाश धुळधुळे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here