अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट केल्याने गंगाखेड येथिल मुस्लिम समाजामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत दि.
31 मे शुक्रवार रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की हरिद्वार उत्तराखंड येथील सिद्धार्थ चतुर्वेदी उर्फ एक्स मुस्लिम समीर या नावाच्या युट्युबरने मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुरानावर पाय ठेवून ग्रंथाच्या प्रती फाडत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला. या कृतीमुळे संपूर्ण देशासह गंगाखेड येथील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आज घडीला देशामध्ये लोकसभेच्या निवडणूका सुरू असून अशा संविधान विरोधी घटना घडत आहेत मुस्लिम समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे अशा घटनांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वेळीच प्रशासनाने अशा निंदनीय कृत्य करणाऱ्या इसमावर कठोर ते कठोर कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम पेंटर यांच्यासह शेख वसीम,शेख सद्दाम,सय्यद वसीम, कट्टू कुरेशी, अदनान खान, शेख फिरोज, अरबाज खान, शेख समीर, शेख पप्पू, तोफिक सौदागर, फिरदोस खान, शेख रियाज, शेख हमीद, सय्यद माजिद, शेख रईस, शाकेर,इरफान, शेख अजमत, रौफ,माजिद,शेख अबूबकर, शेख उमर, मुज्जू सौदागर, सोहेल मणियार, कलीम कुरेशी, आझम सौदागर, शेख साहिल, शेख नदीम, आसरार अहमद, इसाक कुरेशी, शेख सोहेल,बाबा कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत