Home अमरावती श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय,शिरजगाव बंड चा दहावीचा निकाल १०० टक्के

श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय,शिरजगाव बंड चा दहावीचा निकाल १०० टक्के

199

 

अमरावती ( प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरजगाव बंड चा यावर्षीचा वर्ग १० वी चा १०० टक्के निकाल असून परीक्षेत सहभागी ३६ विद्यार्थ्यांमधून ३६ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रावीण्य श्रेणीत ७ ,प्रथम श्रेणीत १६ व द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वर्ग १० मधून ८८.४० % गुण मिळवून कु.प्रत्यक्षा हेमंत धुळे शाळेतून प्रथम आली.द्वितीय स्थानी कु.श्रेया संतोष मोहोड ला ८२.६० टक्के गुण मिळाले.तर अक्षय सतीश वाघमारे ला ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री अतुल भुजंगराव ठाकरे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.सी.व्ही.खवले मॅडम,श्री डी.बी.तायडे सर,श्री जे.डब्ल्यू.चोपडे सर,श्री ए.एस.देशमुख सर,श्री पी.एम.मोहोड सर,सौ.सोनाली दळवी मॅडम,सौ.संगीताताई सिनकर,श्री गजानन शेकार व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. ओमप्रकाश ढोरे,प्रा.सुमित वेलकर व प्रा.पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
” आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला ” कर्ते व आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री अतुल ठाकरे यांनी माध्यमिक विद्यालयातील सर्व मार्गदर्शक शिक्षक, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here