_पचन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यात आपण खाल्लेले अन्न पचनग्रंथींच्या स्रावांच्या संमिश्रणाने सरल रेणूंमध्ये रुपांतरित होते. ही संस्था अन्ननलिका तोंडापासून सुरू होऊन पुढे घसा, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार अशी बनलेली असते. त्यांत लाळ उत्पादक ग्रंथी, जठर, यकृत, स्वादुपिंड, आणि लहान आतडे यांचा समावेश असतो. स्वतः डाॅक्टर नसूनही “माझे आरोग्य, माझ्याच हाती” या उक्तीप्रमाणे श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी खास वाचकांच्या सेवेत सदर संकलित लेख प्रस्तुत करताहेत… संपादक._
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याची काळजी घेण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स- ● निरोगी आहार व विहार जीवनशैली योग्य असणे आवश्यक. ● फळे, पालेभाज्या, फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे. ● शरीरासाठी पाणी हे अमृतासारखे आहे. दिवसभरात कमीतकमी पाच लिटर पाणी प्यावे. ● योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. ● रोजच्या जेवणात स्निग्ध पदार्थ, सकस, संतुलित, नियमित, पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य सुधारते. ● आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते. ● आहारातील स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. ● अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो आदीसारखे रोग उद्भवतात. ● वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेसंबंधी काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. ● सुयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभते. ● नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. ● व्यायामामुळे आरोग्य व्यवस्थित- सुदृढ राहते. ● व्यायामासोबतच विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे. ● आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रियांचा आंतरिक सहसंबंध आहे.
आरोग्य किंवा तब्बेत हा शब्द असा आहे की, त्याचा अर्थ काय? हे आपणा सगळ्यांना माहित आहे. पण ते नेमक्या शब्दांत सांगता ये नाही. आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार वा वेदना नसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच स्वास्थ्य व्यवस्थित राहते. २९ मे रोजी जागतिक पचन स्वास्थ्य दिवस आहे. आपली पचनक्रिया स्वस्थ असेल तर आपले आरोग्य देखील चांगले- स्वस्थ राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ पचनक्रियांशी संलग्न असते. मनुष्याचे शरीर स्वस्थ तेव्हाच असते जेव्हा पचनक्रिया व्यवस्थित असेल. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात तरच आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थित करू शकतो.
आरोग्य चांगले राहण्यासाठी आपले शरीरही निरोगी हवे. मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्बेत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी व सुखी जीवनही व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. अशी शरीराची आणि मनाची अवस्था असते. भक्कम शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास सक्षम असते. आपल्या शरीराचा एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना जर नीट दिसत नसेल, कमी ऐकू येत असेल, खांदे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो. पण ज्याला हा कोणताच त्रास नसतो, तो जास्त आणि चांगले काम करू शकणार नाही का? आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग- व्याधी जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थित पार पाडण्यास शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून आरोग्य ही संकल्पना अत्यंत महत्वपूर्ण आहे. याविषयावर डाॅक्टर म्हणतात की, आपली पचनक्रिया स्वस्थ असेल तर आपले आरोग्य देखील स्वस्थ राहते. कारण बहुसंख्य व्याधींना कारणीभूत पचनक्रियाच असते. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी निरोगी आहार व विहार जीवनशैली योग्य असणे अत्यावश्यक आहे. व्यक्तीची पचनक्रियाच काम सुरळीतपणे पार पाडत नसेल तर त्यास अपचनाचा आजार जडतात. जसे की, आम्लपित्त, उलटी, जुलाब, जाडेपणा, मधुमेह. त्यासाठी आहार हा पौष्टिक असावा लागतो. निरोगी राहणे हे व्यक्तीच्या सात्विक जीवनशैली आणि पौष्टिक आहार यांवर अवलंबून असते. पचनशक्ती सशक्त राहण्यासाठी फळ, पालेभाज्या आणि फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे असते. रोजच्या जेवणात जास्त मेदयुक्त पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. शरीरासाठी पाणी हे अमृतासमान आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते. जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल, तर पचन संस्था व्यवस्थित कार्य करत नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास उद्भवतो. खाण्यापिण्यासोबतच धूम्रपान आणि मद्यपान सेवन करू नये. कामातील ताणतणाव टाळावे. रोज तीन वेळा व्यवस्थित आणि वेळेवर जेवण करावे. प्रत्येकांनी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे.
!! आंतरराष्ट्रीय पचन स्वास्थ्य दिनाच्या सर्व भावाबहिणींना निरामय जीवनाकरीता हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.