Home अमरावती ” गौतम बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे आचरण आवश्यक ” – प्रा.अरुण बुंदेले...

” गौतम बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे आचरण आवश्यक ” – प्रा.अरुण बुंदेले ” उपेक्षित समाज महासंघ व महानायक संघटनेतर्फे बुद्धजयंती संपन्न “

139

 

 

अमरावती( प्रतिनिधी )
स्थानिक शिवटेकडीच्या पायथ्याशी महात्मा तथागत गौतम बुद्ध यांची जयंती कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,उपेक्षित समाज महासंघ व महानायक संघटनेतर्फे
दि.२३ मे २०२४ ला उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड
प्रमुख वक्ते अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख अतिथी सुरेश मेश्राम (अध्यक्ष,महानायक संघटना) , इंजि सुभाष गोहत्रे,सुप्रसिद्ध गझलकार देविलाल रौराळे, मधुकर आखरे होते.
अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महात्मा तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करून वंदन करण्यात आले.
प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वलिखित ” निखारा ” या काव्यसंग्रहातील ” गौतम बुद्ध ” या वंदनगीताचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
बॉक्स
” आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांच्या विचारांची गरज ”
समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण
बनसोड
अध्यक्षीय भाषणातून समाज भूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ,” आज जगातील 90% लोक हे दुःखाने पीडित आहेत. त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी युद्धाची नव्हे तर बुद्ध विचारांची गरज आहे.तथागत गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य समता बंधुतेवर आधारित मानवतावादी असल्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला.या बुद्धाच्या मानवतावादी विचारांची कास धरण्याची आज गरज आहे .” असे विचार व्यक्त केले .
प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी,” तथागत गौतम बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे प्रत्येकाने आचरण करून आदर्श जीवन जगले पाहिजे. संम्यक दृष्टी,संम्यक संकल्प, संम्यक वाचा ,सम्यक कर्मांत, सम्यक अजीविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती आणि संम्यक समाधी या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये तथागत गौतम बुद्धांचे आदर्श तत्त्वज्ञान दडलेले असून जीवनात सुखाच्या क्षणासाठी – सुंदर जीवनासाठी या आर्य अष्टांगिक मार्गाचे आचरण प्रत्येकाने केले पाहिजे .”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी महानायक संघटनेचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, इंजि.सुभाष गोहत्रे,गझलकार देवीलाल रौराळे यांनी ” तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराची गरज ” या विषयावर विचार व्यक्त केले.
केले . तसेच गझलकर देवीलाल रौराळे यांनी ” वसुंधरेच्या गर्भात बुद्ध आहे ” या गझलचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सामाजिक कार्यकर्ते मधुकर आखरे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रमाला अशोक बागडे, विकास हेटे,राजेश जाधव, नंदूभाऊ वानखडे,संजय गोंडाणे,वैभव देवरणकर,रमेश चौधरी,कौशिप मन्सुरी आनेक मनसुरी,संदीप चौधरी,अनिल
माहोरे,भगवंतराव तांबे,प्रकाश किरडकर तसेच महानायक संघटना,कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान,उपेक्षित समाज
महासंघ,फुले -शाहू -आंबेडकरी संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here