Home महाराष्ट्र पांडव पुरी यांच्या पाऊलखुणा समाजासाठी प्रेरक: सुनील गोसावी

पांडव पुरी यांच्या पाऊलखुणा समाजासाठी प्रेरक: सुनील गोसावी

183

 

सोनई ता.नेवासा (प्रतिनिधी): *मागच्या पिढीतील सामजिक जाणिव,प्रवास आणि तळमळ पुढच्या पिढीला समजावी आणि नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी पाऊलखुणा निश्चितच प्रेरणादायी ठरतील,* असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.
श्री.पांडव पुरी यांचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळा व त्यांनी लिहिलेल्या ‘पाऊलखुणा आणि महायोगी रेवणाथ महाराज’ या दोन पुस्तकाचे प्रकाशन माऊली प्रसाद सभागृह,सोनई या ठिकाणी मारुती मित्र मंडळाचे बी.जी.शेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात ते बोलत होते.यावेळी विचारपिठावर भानुदास धुमाळ,के.डी. शिकारे, कारभारी शिंदे, हरिभाऊ ससे, कवयित्री शर्मिला गोसावी, विनायक गिरी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील गोसावी म्हणाले की, आपण ज्या समाजामधून जन्माला आलो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी तळमळीने मागच्या सर्व पिढीतील पाऊलखुणा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं जीवन चरित्र वाटाड्या प्रमाणे नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.’
शंभू महाराज गोसावी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी छंद असला पाहिजे आणि त्या छंदातूनच पांडव पुरी यांनी अनेक माणसे जोडले असून पुस्तकाचे लेखनही केलेले आहे त्यामुळे त्यांचे जीवन सुकर झालेले आहे.
अनिल गडाख म्हणाले की, ‘पांडव पुरी यांच्या मुलाचा मित्र म्हणून मला जवळून सर्व पाहता आले त्यांचे हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.जी.शेटे म्हणाले की, कृतज्ञतापूर्वक पांडव पुरी यांनी हे पुस्तक लिहिलेले असून सर्व घराण्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला आहे. आपल्या जीवन चरित्रामध्ये कोणताही आडपडदा न ठेवता केलेले लेखन असल्याने ते वाचनीय झालेले आहे.
कवयित्री शर्मिला गोसावी यांनी त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा उल्लेख करून महिलांसाठी खास कविता सादर केली.
पांडव पुरी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, ‘अंतरंग अहमदनगर जिल्हा शतायुषी या पुस्तकानंतर मला मागील सर्व अनुभव संघर्ष सेवा याबद्दल लिहिण्याची प्रेरणा झाली आणि त्यामुळेच पाऊलखुणा वाचकांसमोर ठेवत आहे माझ्या घरातील सर्वांनीच मला प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले त्यामुळेच हे पुस्तके आपल्यासमोर मी आणू शकलो’.
या कार्यक्रमास गणेश गोसावी, बबनराव गिरी, ज्ञानदेव पाटील धुमाळ,रामचंद्र बन, हरिभाऊ ससे, शरद गोसावी,संदीप गोसावी,अरुण आहेर, जगन्नाथ गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती मित्र मंडळाचे के डी शिकारे यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय गिरी यांनी केले. तर शेवटी विजयकुमार पुरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्रकुमार पुरी,जयश्री गिरी, प्रतिभा पुरी,मेघना पुरी, आकाश पुरी, सुशील पुरी यांच्यासह मारुती मित्र मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषद, नेवासा शाखेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सुवासिनींनी प्रथम त्यांचे औक्षण करून अभिष्टचिंतन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here