Home Breaking News सांगली जिल्ह्यात एकहाती नेतृत्व करण्याची संधी गमावली?

सांगली जिल्ह्यात एकहाती नेतृत्व करण्याची संधी गमावली?

139

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : नुकतीच सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीने पार पडली.यामध्ये महायुती व महाआघाडी असाच एकास एक सामना व्हायला हवा होता.परंतू पडद्याआड जे डावपेच, रणनिती,शहकाटशह आखले गेले त्यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव ठळकपणे समोर येत आहे.जर का भाजपचा उमेदवार निवडून आला तर महाआघाडी म्हणून सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्याबद्दल संशय निर्माण होऊन त्यांचे सांगली जिल्ह्यात नेतृत्व स्वीकारले जाणार का? हे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.
सांगली लोकसभेची निवडणूक ही संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील न होता जेजेपी विरूद्ध जयंत पाटील गट अशीच सरळसरळ झाल्याचे दिसून आले.कारण भाजपचे उमेदवार संजयकाका विरोधक व जयंत पाटील विरोधक यांनी उघडपणे हातमिळवणी केल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना लाभ होणार आहे.आता याचा दुरगामी राजकीय परिणाम सांगली जिल्ह्यात कितपत होतो,हे आगामी निवडणुकीत समोर येईल.
मागील काही वर्षांपासून जयंत पाटील यांचे राजकारण खूपच डबलगेमचे राहिले आहे.ते भुमिका घेतात एक व वेगळाच करेक्ट कार्यक्रम करून दाखवतात.लोकसभा निवडणुकीत २०१४,२०१९ व २०२४ मध्ये ते उघडपणे प्रचार अधिकृत उमेदवाराचा करायचे परंतु निवडून दुसऱ्याला आणायचे.याचा सर्वात जास्त फटका दादा घराण्याला झाला आहे.त्या नंतर जेष्ठ नेते आर.आर.आबा पाटील व कॉग्रेसचे नेते यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करून त्यांना ही जेरीस आणले होते.जनता दलाचे संभाजी पवार ,शरद पाटील,मा.आ.विलासराव शिंदे,मा.मंत्री आण्णासाहेब डांगे, शेतकरी नेते राजु शेट्टी, शिराळ्यात शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे,जतचे विलासराव जगताप,खानापूरचे अनिल बाबर यांना जयंत पाटील यांच्या सहवास,सोबत व राजकारणाचा स्पष्टपणे नुकसान सोसावे लागले आहेत. अजून जिल्हा पातळीवरील ही संख्या खूप मोठी आहे.त्यामुळे हा दगाफटका सोसलेल्या नेत्यांची संख्या खूप मोठी आहे.त्यामुळे सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात जयंत पाटील विरोधक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत.त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होत आहे.गेल्या दहा वर्षांत सांगली जिल्ह्यात जयंत पाटील ठरवतात तीच दिशा व तोच अंतीम निर्णय मान्य केला जात असे.
या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या भूमिकेला छेद देण्याचे काम झाले आहे, यामध्ये आक्रमक पवित्रा मा.मंत्री विश्वजीत कदम यांनी घेतला आहे.त्यामुळे एका अर्थाने ही निवडणूक सरळसरळ जयंत पाटील विरूद्ध विश्वजीत कदम यांच्यात थेट झाल्याचे बोलले जाते.गत डीसीसी बॅंक निवडणुकीत जयंत पाटील यांच्या अंतर्गत खेळीमुळे जतचे आ.विक्रम सावंत यांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचे शल्य कदम गटाला आहे.यापुढे हाच त्रास कडेगांव पलूस मतदारसंघात विश्वजीत कदम यांना नक्कीच होणार आहे.म्हणुन आताच आक्रमक भूमिका घेऊन जशास तसे राजकारण करणार असल्याचे इशारा दिला आहे.
यापुढे सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून कॉग्रेस व शिवसेना ( उबाठा) हे जयंत पाटील यांच्यावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करतील हे मात्र नक्की,कारण दुध अनेकवेळा पोकळे आहे.
सांगली जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जयंत पाटील यांचा हस्तक्षेप व उपद्रव वाढला आहे.त्यामुळे त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना सोडून जात आहेत.विट्याचे मा.नगराध्यक्ष वैभव पाटील, सांगलीतील अनेक नगरसेवक,पलुस तालुक्यातील नेत्यांनी जयंतरावांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
याचा अर्थ गेल्या दहा पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांचा शब्द प्रमाण मानला जात असे,तोच दबदबा आता आगामी काळात राहिल का माहित नाही? कारण सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जर विशाल पाटील हे नाव जयंत पाटील यांनी सुचवले असते तर नक्कीच सांगलीत कॉग्रेस मजबूत झाली असती.जयंत पाटील यांना जिल्हा नेतृत्व म्हणून एकमुखी मान्यता मिळाली असती.विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठा जनाधार मिळाला असता.परंतु जयंतराव यांचे राजकारण सतत स्वतः:चे वर्चस्व,स्वत:च्या गट तयार करण्याचे व विरोधक संपवण्याचे असल्याने एकीकडे फायदा झाल्याचे दिसत असले तरी विरोधक मोठ्या प्रमाणात तयार करून घेतले आहेत.
गेल्या वीस वर्षांत लोकसभा निवडणुकीत सांगलीत घेतल्या गेलेल्या भुमिकेचे पडसाद शेजारच्या हातकणंगले मतदारसंघात दिसून येतात.यावेळी सांगलीत विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने हातकणंगले मतदारसंघातील अनेक कॉग्रेसच्या व जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीचे उमेदवार राजु शेट्टी यांचा प्रचार केला आहे. यामध्ये पक्षापेक्षा जयंत पाटील यांच्या उमेदवाराला धडा शिकवणे हा एकमेव हेतू आहे.
एकीकडे देशभरात भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्ष जंग जंग पछाडत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मात्र भाजपला मदत कशी होईल, असे राजकारण करत आहेत,हे अनाकलनीय आहे.या प्रक्रियेत शरद पवार यांचा आर्शिवाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण त्यांनी उमेदवार जयंत पाटील यांना स्पष्ट शब्दात सुनावले असते तर पुढील महाभारत घडले नसते.याचा अर्थ सांगली जिल्ह्यात भाजपची बी टिम कोण आहे,हे सुर्य प्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here