✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
यवतमाळ :- येथील उज्वल नगर भाग ३ मधील हनुमान मंदिरातील चॅनल गेटचे कुलूप तोडून मंदिरात असलेली दान पेटी (लॉकर) चोरट्यांनी लंपास झाल्याची घटना
उज्वल नगर भाग 3 मधील हनुमान मंदिरात घडली.
नगरातील व इतर नगरातील भक्त मंडळी मोठ्या श्रद्धेने मनोभावे पूजा अर्चना करतात.
याच मंदिरात सहा महिन्या पूर्वी लॉकर असलेली पेटी मंदिरात भिंतीला लावण्यात आली होती.
जनेकरून येणारे भाविक त्या मध्ये दान टाकतील व भक्तांनी दिलेल्या दानाचे योग्य प्रकारे नियोजन करून मंदिराचे व मंदिर परिसराचे दान पेटीतील दानाचा उपयोग करून मंदिराचे, मंदिर परिसराचे व समाज उपयोगी कार्य करता येईल या हेतूने सहा महिन्या पासून मंदिर समिती मधील कोणीही पेटी उघडून पहिली नाही याचं काळामध्ये हनुमान हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात झाला होता.
लग्नसराई असल्यामुळे बरेचसे नवरदेव येऊन दानपेटीत दान टाकायचे, भक्त मंडळी तर रोज दान टाकायचे, पेटीमध्ये सहा महिन्यात जमा झालेले हजारो रुपये असेल, अशातच शुक्रवार दिनांक 17 ला मध्यरात्री दोन ते चार च्या दरम्यान अज्ञात चोरांनी चॅनलचे गेटचे कुलूप तोडून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला, चोरांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु दानपेटी ही गोदरेज कंपनीचे मजबूत लॉकर असल्यामुळे चोरांना ती फोडता आली नाही.
दानपेटी फोडता आली नाही म्हणून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी भिंतीतून उखडून सोबत घेऊन गेले, दुसऱ्या दिवसाची रात्र होऊन देखील नगरातील कोणीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार (रिपोट) नोंदविली नाही त्यामुळे विनोद दोंदल यांनी पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार (रिपोट) दिले हया वेळी विनोद दोंदल यांच्या सोबत सुरेशरावजी धकाते, प्रवीण मिरासे, दिनेश खुरद इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते.